All priests will earn the same : मंदिरांतील पुजाऱ्यांचे मानधन एकसमान होणार
April 9, 2026 06:32 PM
All priests will earn the same
राज्य सरकार धोरण ठरवणार; मंत्रालयात झाली विशेष बैठक
मुंबई: काही देवस्थानांमध्ये पुजाऱ्यांना नियमित वेतन दिले जाते, तर काही ठिकाणी दक्षिणा स्वरूपात उत्पन्न मिळते. या विविध पद्धती लक्षात घेऊन राज्यभर एकसमान आणि न्याय प्रणाली विकसित करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याविषयी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंत्रालयात नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला धर्मादाय आयुक्त एस्. एस्. कलोती यांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या विषयी अधिक माहिती देतांना राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार यांना ज्याप्रमाणे स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे, त्याच धर्तीवर राज्यातील विविध देवस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या सेवा देणाऱ्या पारंपरिक पुजारी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सन्मानपूर्वक उपजीविकेसाठी राज्यशासन लवकरच सर्वसमावेशक धोरण आणणार आहे. धार्मिक परंपरेचा सन्मान राखत पुजाऱ्यांना स्वतंत्र आणि सुसंगत दर्जा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.