Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की, बांगलादेश संघ भारताला भेट देण्यास इच्छुक असून, या वर्षाच्या अखेरीस बांगलादेशमध्ये द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भारताला आमंत्रित केले आहे. सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग म्हणून भारत यावर्षी बांगलादेशचा दौरा करणार आहे, ज्यामुळे या घडामोडीचे महत्त्व आणखी वाढले आहे. यातून बांगलादेशातील नवीन प्रशासनाचा भारतासोबत संबंध प्रस्थापित करण्याचा आणि क्रिकेट संबंधांमधील अलीकडील तणावपूर्ण काळातून पुढे जाण्याचा प्रयत्न दिसून येतो.


विशेष म्हणजे बांगलादेशने तमीम इक्बाल यांची देशाचे सर्वात तरुण क्रिकेट प्रमुख म्हणून नियुक्ती केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.



बांगलादेश क्रिकेट बोर्डाला झाली संभाव्य नुकसानीची जाणीव :


कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी (Bangladesh Cricket Board) वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानचा आयपीएल करार रद्द केला होता. त्यानंतर बीसीबीने त्याला टी-२० विश्वचषकासाठी भारतात येण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर आयसीसीने बांगलादेशला टी-२० विश्वचषकातून वगळून, बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.आयसीसी आणि बीसीसीआयबरोबर झालेल्या संघर्षानंतर आपल्या क्रिकेटला होणाऱ्या संभाव्य नुकसानीची जाणीव बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आता झाली आहे. त्यामुळे, बोर्डाने बीसीसीआयला पत्र लिहून क्रिकेट संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.



दुसरीकडे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (Bangladesh Cricket Board) प्रमुख अमीनुल इस्लाम बुलबुल यांना सरकारने पदावरून हटवल्यानंतर त्यांनी आयसीसीकडे धाव घेतली आहे. अमीनुल इस्लाम बुलबुल हे त्यांच्या खेळाच्या दिवसांतील लढवय्या वृत्तीसाठी ओळखले जात होते. कसोटी शतक झळकावणारे ते पहिले बांग्लादेशी फलंदाज होते.


वास्तविक पाहता, बांगलादेशच्या नवनिर्वाचित सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय क्रीडा परिषदेने बुलबुल यांच्या नेतृत्वाखालील बोर्ड बरखास्त करून त्या जागी ११ सदस्यीय अंतरिम समितीची स्थापना केली. नवीन निवडणुका होईपर्यंत ही समिती बोर्डाच्या कामकाजावर देखरेख ठेवेल. या तदर्थ समितीच्या प्रमुखपदी बांगलादेशचे माजी कर्णधार तमीम इक्बाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Bangladesh Cricket Board)

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात