Dhurandar 2 : बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई, आता 'या' OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार धुरंधर २

मुंबई : रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला असून सिनेमा रिलीज होऊन २१ दिवस उलटले असतानाही सिनेमागृहातील गर्दी कमी होण्याचं नाव घेत नाहीये. बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडून काढणारा हा सिनेमा सर्वात कमी वेळात १००० कोटींचा नेट आकडा गाठणारा एकमेव भारतीय सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा अनेकांनी एकापेक्षा जास्त वेळा थिएटरमध्ये जाऊन पाहिला आहे. अशातच आता या धुरंधर २ सिनेमाच्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. जर तुम्हीलाही हा सिनेमा ओटीटीवर पाहायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.


या सिनेमानं जागतिक पातळीवर १६६० कोटींहून अधिक कलेक्शन केलं असून धुरंधर २ नं भारतात १२०० कोटींचा गल्ला पार केला आहे. इतकं मोठं कलेक्शन करून धुरंधर २ पहिल्या भागापेक्षाही सुपरहिट ठरला आहे. १९ मार्चला रिलीज झालेल्या या सिनेमाची क्रेझ अजूनही कायम आहे.


दरम्यान, आता धुरंधर २ च्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. धुरंधरचा पहिला भाग नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. यानंतर प्रेक्षकांना वाटलं होतं की दुसरा भागही याच प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. मात्र, आदित्य धर यांनी या सिनेमाचे डिजिटल हक्क 'जिओ हॉटस्टार' ला विकले आहेत. त्यामुळे आता हा स्पाय थ्रिलर पाहण्यासाठी तुम्हाला जिओ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. अशातच हा सिनेमा ओटीटीवर कधी रिलीज होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार जिओ हॉटस्टार धुरंधर २ सिनेमा IPL 2026 संपल्यानंतर स्ट्रीम करण्याच्या तयारीत आहे. आयपीएलची धामधूम सुरू असताना सिनेमाच्या व्ह्यूअरशिपवर परिणाम होऊ नये, हा यामागचा विचार असल्यानं मे महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात 'धुरंधर २' ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार