Chhatrapati Sambhajinagar Crime : थरारक! छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा प्रेयसीची गळा चिरून हत्या; पेट्रोल पंपावरील घटनेने जिल्हा हादरला

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील करमाड परिसरात आज दुपारी माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना घडली. एका माथेफिरू तरुणाने आपल्याच प्रेयसीचा भरवस्तीत निर्घृण खून केल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने केवळ कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढले नसून, महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीररित्या ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा सुदाम गावंडे ही तरुणी करमाड येथील गणपती मंदिराजवळ असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर कामाला होती. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास, जेव्हा पेट्रोल पंपावर नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ होती, तेव्हा तिचा प्रियकर त्या ठिकाणी पोहोचला. काही कळण्याच्या आतच, त्याने खिशातून चाकू काढून पूजाच्या गळ्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूजाचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा आणि लोकांच्या प्रत्यक्ष डोळ्यादेखत घडलेल्या या थरारामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि ग्राहक स्तब्ध झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. आरोपीने इतक्या धाडसाने हे कृत्य केल्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर आणि गुन्हेगारांवरील धाकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. करमाड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.



शाब्दिक चकमक अन् थेट गळ्यावर वार


पूजा गावंडे ही तरुणी नेहमीप्रमाणे इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर आपली ड्युटी करत होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास तिचा प्रियकर सत्यम रावसाहेब गावंडे तिथे पोहोचला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला त्या दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची सुरू झाली. दोघांमधील हा वाद क्षणाक्षणाला वाढत गेला. संतापाने बेभान झालेल्या सत्यमने आपल्या खिशातील चाकू बाहेर काढला आणि काहीही विचार न करता पूजाच्या गळ्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका अनपेक्षित आणि भीषण होता की पूजाला सावरण्याची संधीही मिळाली नाही. चाकूचा वार वर्मी लागल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे पूजा रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळली. उपस्थित लोकांनी मदतीसाठी धाव घेण्यापूर्वीच तिचा जागीच मृत्यू झाला होता. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि नागरिक सुन्न झाले आहेत.



नेमकं काय घडलं ?


करमाड येथील पेट्रोल पंपावर घडलेल्या पूजा गावंडे हत्या प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला असून, आरोपीने केवळ पूजाची हत्याच केली नाही, तर तिला वाचवण्यासाठी येणाऱ्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे उघड झाले आहे. ज्यावेळी सत्यम गावंडे पूजावर चाकूने वार करत होता, तेव्हा पंपावरील एका व्यक्तीने मोठ्या धैर्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्ताने माखलेला चाकू हवेत फिरवत आरोपीने त्या व्यक्तीलाही धाक दाखवला आणि मागे हटण्यास भाग पाडले. उपस्थित नागरिकांच्या डोळ्यादेखत हा थरार घडला आणि या दहशतीचा फायदा घेत आरोपी सत्यमने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची भीषणता पाहून करमाड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पूजाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-mortem) रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या हत्येमागे प्रेमप्रकरणातील जुना वाद किंवा चारित्र्याचा संशय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फरार आरोपी सत्यम गावंडेच्या शोधासाठी करमाड पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे हत्या करण्याचे धैर्य गुन्हेगारांमध्ये येतेच कसे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने