Iran-US-Israel War : बेरूतमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रमुख नेत्याच्या मृत्यूचा इस्त्रायलने केला दावा

फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या अमेरिका - इस्त्रायल आणि इराण (Iran-US-Israel War) या युद्धात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठे हवाई हल्ले केले. त्यात इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांवर प्रचंड नुकसान झालं. त्याच्या प्रत्युत्तरात इराणने अमेरिकेच्या तळांवर, इस्रायलवर आणि मध्यपूर्वेतील इतर देशांवर मिसाइल आणि ड्रोन हल्ले केले. या संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्व देश पेटून उठले.


पण आताची मोठी बातमी म्हणजे इस्त्रायलच्या सैन्याने गुरुवारी दावा केला की, बुधवारी (८ एप्रिल) बेरूतमध्ये झालेल्या इस्त्रायली (Iran-US-Israel War) हवाई हल्ल्यात हिज्बुल्लाह नेता नईम कासिम यांच्या सचिवाचा मृत्यू झाला आहे.


आयडीएफने (इस्त्रायल डिफेन्स फोर्स) सांगितले की, बेरूतमधील तल्लेत खयात परिसरात, हिज्बुल्लाहचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दाहियेह भागाबाहेर अली युसुफ हर्षी याला लक्ष्य करण्यात आले. समोर आलेल्या फुटेजमध्ये या हल्ल्यामुळे एक बहुमजली इमारत अंशतः कोसळल्याचे दिसून आले. सैन्याच्या माहितीनुसार, हर्षी हा कासिम यांचा पुतण्या आणि वैयक्तिक सचिव होता. (Iran-US-Israel War)


सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “हर्षी हा हिज्बुल्लाहचे महासचिव नईम कासिम यांचा निकटवर्तीय सहकारी आणि वैयक्तिक सल्लागार होता. त्यांच्या कार्यालयाचे तसेच सुरक्षेचे व्यवस्थापन करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.”


दरम्यान, आयडीएफने सांगितले की रात्रीच्या वेळी लिटानी नदीवरील दोन प्रमुख मार्गांवर हल्ला करण्यात आला. या मार्गांचा वापर हिज्बुल्लाह दक्षिण लेबनानमध्ये हजारो शस्त्रे, रॉकेट्स आणि लॉन्चर्स पोहोचवण्यासाठी करत होता.याशिवाय, दक्षिण लेबनानमध्ये सुमारे 10 शस्त्रसाठे, रॉकेट लॉन्चर आणि हिज्बुल्लाहच्या मुख्यालयांवरही हल्ले करण्यात आल्याची माहिती सैन्याने दिली आहे. (Iran-US-Israel War)


त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की, एकीकडे युद्धविराम जरी जाहीर करण्यात आला असला तरीही लेबनॉन आणि हेजबोलावरील हल्ले (Iran-US-Israel War) मात्र अजूनही सुरूच आहेत. अमेरिकेने स्पष्ट केलं आहे की जर करार पाळला गेला नाही, तर ते पुन्हा मोठा हल्ला करू शकतात. तर इराणही मागे हटायला तयार नाही.


Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.