Matka King : दमदार स्टारकास्ट असणाऱ्या नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : मराठी सिनेविश्वात सैराट, फॅन्ड्री, नाळ यांसारख्या सिनेमांमधून मातीतल्या वास्तववादी कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे दिग्दर्शक-निर्माते नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule)आता ओटीटीवर नव्या अवतारात झळकणार आहेत. मटका किंग या वेबसिरीजच्या माध्यमातून नागराज मंजुळे पुन्हा एकदा एक दमदार कथानक घेऊन समोर आले आहेत. सध्या या वेब सिरीजची मनोरंजन विश्वात एकच चर्चा आहे. ओटीटीवर येणारी 'मटका किंग' (Matka King) ही वेब सिरीज केवळ एक गुन्हेगारी कथा नसून नागराज मंजुळे यांची ही नवी निर्मिती एका अशा जगात घेऊन जाते, जिथे ‘मटका’ हा फक्त जुगार नसून सत्ता, गणित, मानसशास्त्र आणि सामाजिक वास्तव यांचा गुंता आहे.


‘मटका किंग’ची कथा एका अशा काळात घडते, जेव्हा मटका हा फक्त खेळ नव्हता, तर अनेकांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता. या जगात पैसा जितक्या वेगानं येतो, तितक्याच वेगानं माणसाला गिळतोही. मालिका या जगाच्या ग्लॅमरला फक्त पृष्ठभागावर ठेवत नाही, तर त्यामागचं काळं वास्तव उघड करत जाते. एक अशी दुनिया, जी कधीकाळी जगली गेली होती, आणि एक अशी व्यक्तिरेखा, जी निरीक्षण आणि अनुभवातून घडवली गेली, हे दोन्ही प्राइम व्हिडिओच्या “मटका किंग” मध्ये एकत्र येतात.


अभय कोराणे यांनी क्रिएट आणि लिहिलेली, तसेच नागराज पोपटराव मंजुळे यांनी क्रिएट, लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत विजय वर्मा, कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जडावत आणि गुलशन ग्रोवर प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. याबरोबरच भारत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीव्हर, किशोर कदम, सायरस सहुकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोटांगिया आणि सिमरन अश्विनी देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.


?si=3Tb9LCquqPJ256dp

येत्या १७ एप्रिल २०२६ रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणारी ही मालिका, मजबूत लेखन, वास्तववादी दिग्दर्शन आणि दमदार अभिनयामुळे या वर्षातील सर्वात चर्चेत राहणाऱ्या वेबसिरिजपैकी एक ठरू शकते. जर तुम्हाला वास्तववादी कथा आवडत असतील, तर ‘मटका किंग’ वेबसिरिज तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’