Akshay Kumar Injured : 'भूत बंगला'च्या शूटिंगदरम्यान अभिनेता अक्षय कुमारला दुखापत, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारला त्याच्या आगामी 'भूत बंगला'(Bhooth Bangla) या हॉरर-कॉमेडी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना दुखापत झाली. सिनेमाच्या निर्मात्यांनी गुरुवारी म्हणजेच ९ एप्रिल २०२६ रोजी शेअर केलेल्या एका Behind The Scenes व्हिडिओमध्ये, अक्षय ॲक्शन सीन करताना दिसतोय. आपले अनेक स्टंट्स स्वतःच करण्यासाठी ओळखणारा जाणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) या व्हिडिओमध्ये, हवेत उडी मारून 'जंप किक' मारताना दिसतोय. मात्र, जमिनीवर उतरताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. यावेळी अक्षयला दुखापत झाली.


अक्षयनं केवळ 'व्हिज्युअल इफेक्ट्स' किंवा कृत्रिम तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्यापेक्षा, प्रत्यक्ष स्टंट्स स्वतःच करण्याच्या आपल्या पसंदीबद्दल नुकताच भाष्य केलं होतं. अक्षय म्हणालेला की, VFX किंवा AI चा अतिवापर केल्यास ॲक्शन सीनचा खरेपणा आणि त्यातील थरार कमी होऊ शकतो. तसेच, प्रत्यक्ष स्टंट्समुळे प्रेक्षकांना त्या सादरीकरणामागे घेतलेले कष्ट खऱ्या अर्थाने अनुभवता येतात, असेही यावेळी तो म्हणाला.


या सिनेमात अक्षयबरोबरच परेश रावल, असरानी, राजपाल यादव, तब्बू आणि वामिका गब्बी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'भूत बंगला' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकताच पुढे ढकलण्यात आली असून सुरुवातीला हा सिनेमा १० एप्रिल २०२६ रोजी रिलीज होणार होता, परंतु आता हा सिनेमा १६ एप्रिल २०२६ रोजी रिलीज होणार आहे.





या सिनेमाबद्दल इन्स्टाग्रामवर माहिती देत एकता कपूरनं लिहिलं की, 'आमचे डिस्ट्रिब्युटर्स आणि सिनेमागृह मालकांशी एकत्रित चर्चा केल्यानंतर, आम्ही 'भूत बंगला'च्या प्रदर्शनासाठी १६ एप्रिल २०२६ ही नवीन तारीख निश्चित केली असून या दिवशी रात्री ९ वाजता सिनेमाचा पहिला शो सुरू होईल. 'धुरंधर: द रिव्हेंज' हा सिनेमा अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत असल्याची बातमी खूप चांगली आहे. या बदलामुळे दोन्ही सिनेमांना प्रसिद्धी मिळवता येईल.'



'भूत बंगला' सिनेमा 'बालाजी मोशन पिक्चर्स' आणि 'केप ऑफ गुड फिल्म्स' यांच्या संयुक्त विद्यमानं सादर करण्यात आला असून सिनेमाची निर्मिती अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी केली आहे. तसेच सिनेमाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं आहे. येत्या १६ एप्रिल २०२६ रोजी भूत बंगला सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या