Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई! प्रतिभा चाकणकरांना पोलिसांची नोटीस

- कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास तीव्र 


भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) यांना शिर्डी पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील पाच दिवसांत त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


या प्रकरणाचा संबंध समता पतसंस्थेतील (Samata Patsanstha) संशयास्पद खात्यांशी जोडला जात असून, कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांचा तपास सुरू आहे. तपासात प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर दोन आणि त्यांच्या मुलांच्या नावावर दोन अशी एकूण चार खाती असल्याचे समोर आले आहे. या चार खात्यांमधून सुमारे २ कोटी ४० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या पैशांचा स्रोत आणि व्यवहारांची साखळी काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.



दरम्यान, अशोक खरात (Ashok Kharat) याच्यावर शिर्डीत सावकारीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याचे या पतसंस्थेशी असलेले संबंधही संशयास्पद असल्याचे तपासात उघड झाले आहे. सध्या पोलिसांकडून खातेदारांचे जबाब नोंदवले जात असून आतापर्यंत ३३ जणांची चौकशी पूर्ण झाली आहे.


या प्रकरणाचा विस्तार Sinnar पर्यंत पोहोचला असून तेथील जगदंबा पतसंस्था (Jagdamba Patsanstha) मध्येही अशोक खरात नॉमिनी असलेली ३२ खाती आढळली आहेत. या खात्यांची चौकशी नाशिक पोलीस करत आहेत. दोन वेगवेगळ्या शहरांतील पतसंस्थांमध्ये एकाच व्यक्तीचे इतके मोठे नेटवर्क असल्याने हे प्रकरण मोठ्या रॅकेटचे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


नोटीस मिळाल्यानंतर प्रतिभा चाकणकर चौकशीसाठी कधी हजर राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात सत्ताधारी पक्षाशी संबंधित नाते असल्यामुळे तपासाला आता राजकीय वळण लागण्याची चिन्हेही दिसत आहेत.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने