Mumbai : बोरिवलीतील बीएसएनएल व एमटीएनएलची आरक्षित जागा पीएम आवास योजनेसाठी वापरणार

मुंबई : पीएम आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) यांच्या मालकीची आरक्षित जागा रेडीरेकनर दरानुसार घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.


महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक कासार, संचालक (प्रशासन) प्रवीण कोळी, तांत्रिक संचालक अभिजित लोंढे, सहायक अधिकारी शिरतेज रसाळ आदी यावेळी उपस्थित होते.


बोरिवली येथील गोराई येथे भारत संचार निगम लिमिटेड यांच्या मालकीची तर शिंपोली येथे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड यांची जागा असून दोन्हीची मिळून एकूण २८.८४ एकर जागा आरक्षित आहे. ही आरक्षित जागा रेडिरेकनर दरानुसार ७२९ कोटी रुपयांना घेऊन या आरक्षित जागेवर पीएम आवास योजनेअंतर्गत घरांचा प्रकल्प राबविण्यास तसेच उर्वरित आरक्षित जागा विकसित करण्याचा प्रस्ताव महामंडळाने बैठकीत ठेवला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली. या जागेवर सुमारे एक हजाराहून अधिक घरे बांधण्याचा प्रस्ताव असल्याचे कासार यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा कसारा येथे मेगाब्लॉक; 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांवर मोठा परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेवर आसनगाव - कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प आणि कसारा यार्डमधील 'अप' यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील