IPL 2026 Wanindu Hasaranga : लखनऊची डोकेदुखी वाढली! स्टार स्पिनर हसरंगा उर्वरित स्पर्धेतून बाहेर

श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) दुखापतीमुळे चालू आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्स ने याची अधिकृत पुष्टी केली आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे हसरंगा अद्याप पूर्णपणे सावरू शकलेला नाही. लखनऊ सुपर जायंट्स पुढील २४-४८ तासांत हसरंगाच्या जागी पर्यायी खेळाडूची घोषणा करू शकतात.


संघाचे ग्लोबल डायरेक्टर टॉम मूडी यांनी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएल प्रसारकाला सांगितले की, “वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) संघात सहभागी होऊ शकणार नाहीत आणि त्यांच्या जागी दुसरा खेळाडू घेण्याची प्रक्रिया आम्ही पुढील २४ ते ४८ तासांत पूर्ण करू.” हसरंगा जवळपास दोन महिन्यांपासून स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. वृत्तांनुसार, तो अद्याप गोलंदाजी करण्यास सक्षम नाही आणि त्याने श्रीलंका क्रिकेटकडून अनापत्ती प्रमाणपत्र (NOC) साठीही अर्ज केलेला नाही.


अहवालांनुसार, दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू जॉर्ज लिंडे याला हसरंगाच्या पर्याय म्हणून संघात सामील करण्याची शक्यता आहे. या डावखुऱ्या गोलंदाजाने अद्याप आयपीएलमध्ये एकही सामना खेळलेला नाही. त्याने शेवटचा टी-२० सामना न्यूझीलंडविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत खेळला, ज्यामध्ये चार डावांत त्याला केवळ एकच विकेट मिळाली होती. तो टी-२० विश्वचषकातही खेळलेला आहे. गेल्या १२ महिन्यांत तो SA20, ‘द हंड्रेड’, ‘मेजर लीग क्रिकेट’ आणि PSL अशा विविध फ्रँचायझी लीग्समध्ये सहभागी झाला होता.



लखनऊ सुपर जायंट्सने मागील लिलावात हसरंगाला (Wanindu Hasaranga) २ कोटी रुपयांत खरेदी केले होते, मात्र दुखापतीमुळे तो संघात सहभागी होऊ शकला नाही. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान श्रीलंकेच्या पहिल्याच सामन्यात डाव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाल्यापासून तो मैदानापासून दूर आहे.


हसरंगाने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकूण ३७ सामने खेळले असून २४.३२ च्या सरासरीने ४६ विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याने एकदा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. मागील हंगामात तो राजस्थान रॉयल्स चा भाग होता, तर २०२१ ते २०२३ दरम्यान तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून खेळला होता.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून