Sara Arjun : धुरंधर गाजवल्यानंतर आता सारा अर्जून साकारणार 'ही' जबरदस्त भूमिका

मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर १००० कोटींची कमाई केली. या सिनेमात तिनं रणवीर सिंहने (Ranveer Singh) साकारलेल्या हमजा अली मझारी या भारतीय गुप्तहेराच्या बायकोची जबरदस्त भूमिका साकारली. सारानं साकारलेल्या या भूमिकेनं प्रेक्षकांची मने जिंकली असून सारा अर्जूनला विशेष प्रसिद्धी मिळाली.


यानंतर आता साराला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारल्यानंतर सारा अर्जून आता बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री मधुबालाच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक जसमीत के रीन हे एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असून, या सिनेमाची निर्मिती संजय लीला भन्साळी करणार असल्याची माहिती आहे.


माहितीनुसार जसमीत यांचा आगामी सिनेमा सध्या प्री - प्रॉडक्शनमध्ये आहे. या वर्षी चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता असून या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीतील गोल्डन एरा दाखवण्यात येणार आहे. या सिनेमातून सारा अर्जूनला मधुबालांसारख्या दिग्गज अभिनेत्रीची भूमिका साकारण्याची संधी मिळणार आहे.


सारासाठी निश्चितच ही एक सुवर्णसंधी आणि मोठे आव्हान ठरणार आहे. रिपोर्टनुसार, 'अष्टपैलू आणि सौंदर्याची खाण असलेली अभिनेत्री मधुबाला यांची भूमिका साकारण्यासाठी सारा अर्जूनला फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल. कॉस्ट्यूम डिटेलिंगपासून ट्रेनिंगपर्यंत, तसेच लूक टेस्टही द्यावं लागेल. निर्माते हा लूक अचूकपणे चित्रित करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीयेत'.


या सिनेमातून फिल्ममेकर्स मधुबाला यांना आदरांजली देणार असल्याचे म्हटले जात आहे. जसमीत रिन यांनी याआधी आलिया भट्ट आणि विजय वर्मा स्टारर डार्लिंग्स सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाला नेटफ्लिक्सवर भरपूर प्रतिसाद मिळाला.


अभिनेत्री मधुबाला यांनी १९५० ते १९६० चा काळ प्रचंड गाजवला. तिच्या दिखेचक अदा आणि सौंदर्यावर लाखो प्रेक्षक फिदा होते. त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारी पहिली अभिनेत्री मधुबाला ठरली होती. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत दोन दशकं ७० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं.



मधुबाला यांनी आपल्या करिअरची सुरुवात बसंत या सिनेमातून केली. हा सिनेमा १९४२ रोजी रिलीज झाला होता. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात चाइल्ड अ‍ॅक्ट्रेस म्हणून केली होती. त्यांचा शेवटचा सिनेमा शराबी होता.


मधुबाला यांचा शेवटचा सिनेमा १९६४ रोजी रिलीज झाला होता. २३ फेब्रुवारी १९६९ रोजी मधुबालाचं निधन झालं. आता अभिनेत्री सारा अर्जूनला मधुबालाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

Comments
Add Comment

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार