Stock Market : आठवड्याच्या अखेरीस बंद होताना शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीत घसघशीत वाढ

मुंबई : पश्चिम आशियातील युद्धामुळे अमेरिकेत कर्ज महाग झाले आहे. याउलट भारतात रेपो रेट स्थिर आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेविषयीचा गुंतवणूकदारांमधील विश्वास वाढला आहे. याचा भारतीय शेअर बाजाराला फायदा होत असल्याचे दिसत आहे. आठवड्याच्या अखेरीस बंद होताना शेअर बाजारात तेजी दिसली. सेन्सेक्स आणि निफ्टीत घसघशीत वाढ झाली.



सेन्सेक्स १.१८ टक्क्यांच्या वाढीसह ७७,५३५ वर तर निफ्टी २७५ अंकांनी वधारून २४,०५० वर बंद झाला. भारतीय अर्थव्यवस्थेविषयीचा गुंतवणूकदारांमधील विश्वास वाढल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसला. एशियन पेंट्सच्या शेअरमध्ये ३.८४ टक्क्यांची, आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये ३.१३ टक्क्यांची, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये ३.०५ टक्क्यांची, इंडिगोच्या शेअरमध्ये २.७७ टक्क्यांची आणि एसबीआयच्या शेअरमध्ये २.५१ टक्क्यांची वाढ दिसली. सन फार्माच्या शेअरमध्ये ३.६५ टक्क्यांची, इन्फोसिसच्या शेअरमध्ये २.९४ टक्क्यांची, टीसीएसच्या शेअरमध्ये २.४५ टक्क्यांची, टेक महिंद्राच्या शेअरमध्ये १.६० टक्क्यांची, एचसीएल टेकच्या शेअरमध्ये ०.९० टक्क्यांची घसरण दिसून आली. एआयचा वाढता प्रभाव आणि अमेरिकेवरील अवलंबित्व या दोन प्रमुख कारणांमुळे निवडक कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसली.



याआधी शुक्रवारी सकाळी ९:१९ वाजता बीएसई सेन्सेक्स ५६० अंकांनी वाढून ७७,१९२ वर पोहोचला होता तर निफ्टी फिफ्टी १८८ अंकांनी वाढून २३,९६३ अंकांवर पोहोचला होता. सुरुवातीला झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स ०.८२ टक्क्यांनी म्हणजेच ६३० अंकांनी वाढून ७७,२६१ वर अर्थात दिवसभरातील उच्चांकावर पोहोचला होता. निफ्टी पण ०.८५ टक्क्यांनी म्हणजेच २०३ अंकांनी वाढून २३,९७८ अंकांवर पोहोचला होता.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि