Earthquake Parbhani and Nanded : मोठी बातमी: मराठवाडा हादरला! परभणी आणि नांदेडमध्ये भूकंपाचे तीव्र हादरे; पत्रे हलल्याने भीतीचे वातावरण

नांदेड : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात आज सकाळी ८:४६ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये जमिनीखालील हालचालींमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. काही ठिकाणी धक्क्यांची तीव्रता इतकी होती की घरांवरील पत्रे उडाले असून जुन्या घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सकाळच्या वेळी अचानक आलेल्या या संकटामुळे नागरिक घरातून बाहेर पडले असून प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



भांडीकुंडी कोसळली, घरांना तडे


हिंगोली जिल्ह्याला आज सकाळी ८:४७ च्या सुमारास भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरवून सोडले. हिंगोलीत वारंवार जाणवणाऱ्या धक्क्यांच्या तुलनेत आजचा हादरा अत्यंत मोठा असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. धक्क्याची तीव्रता इतकी होती की घराघरातील भांडी आणि जीवनावश्यक वस्तू जमिनीवर कोसळल्या, तर अनेक कच्च्या व पक्क्या घरांच्या भिंतींना मोठे तडे गेले आहेत. हिंगोलीसह शेजारील नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतही हे हादरे जाणवले असून, सध्या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.



हिंगोलीत ४.७ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप


हिंगोली जिल्ह्याला आज सकाळी भूकंपाचा भीषण धक्का बसला असून, रिश्टर स्केलवर याची ४.७ इतकी तीव्रता नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू पांगरा शिंदे हे गाव असून संपूर्ण जिल्ह्यातील गावांना याचे तीव्र हादरे जाणवले. धक्का बसताच भयभीत झालेले नागरिक तातडीने घराबाहेर मोकळ्या जागेत धावले. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासन सध्या या भूकंपाचा सविस्तर आढावा घेत असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



हिंगोलीतील 'पांगरा शिंदे' ठरले भूकंपाचे केंद्रबिंदू


मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला असून, त्याचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे गाव असल्याचे समोर आले आहे. जमिनीच्या १० किमी खोलीवर हालचाली झाल्याने ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप नोंदवला गेला. या भूकंपाचे पडसाद शेजारील जिल्ह्यांतही उमटले. नांदेड शहरातील सिडको, वजीराबाद आणि तरोडा सांगावी भागात सकाळी ८:४५ च्या सुमारास धक्के जाणवले. तसेच, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी परिसरातही नागरिकांना भूकंपाचे सौम्य हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा