reservation : अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाबाबत पुढील आठवड्यात सुनावणी

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर १७, १८ एप्रिल रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणीत आपली मते मांडू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी १५ एप्रिलपर्यंत आपले निवेदन किंवा अर्ज सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात आले आहे.


अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणासंदर्भात न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर (निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालय, पाटणा) यांच्या एक सदस्यीय समितीने आपला अहवाल १६ मार्च २०२६ रोजी शासनाला सादर केला आहे. या अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.


ज्यांना या विषयावर आपली बाजू मांडायची आहे, त्यांनी आपले निवेदन किंवा अर्ज dg-sw@barti.in या इमेल आयडीवर पाठवावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२६ आहे. अर्जासोबत अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे.

Comments
Add Comment

Modi Xi Jinping talks : ‘सीमेवर शांतता आणि स्थैर्य हीच द्विपक्षीय संबंधांची प्राथमिक अट’; पंतप्रधान मोदींचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्ट संदेश

नवी दिल्ली: भारत आणि चीन संबंधांमध्ये सुधारणा व सहकार्याचा नवा अध्याय सुरू करण्याच्या प्रयत्नांदरम्यान,

Bhiwandi Hit and Run : क्षणात दुचाकीला उडवलं अन् चालक पसार! भिवंडीतील हिट अँड रनचा थरार CCTVमध्ये कैद

ठाणे : भिवंडी शहरातील कामतघर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. भरधाव

Mohammed Siraj : मोहम्मद सिराजकडे हैदराबाद रणजी संघाची धुरा; आगामी हंगामासाठी कर्णधारपदी नियुक्ती

हैदराबाद: हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (HCA) वरिष्ठ निवड समितीने आगामी २०२६-२७ रणजी ट्रॉफी हंगामासाठी भारताचा

Crime News : सोनिता शर्मा प्रकरणात धक्कादायक खुलासा! सोनिताला हॉटेलमधून बाहेर नेतानाचा व्हिडिओ समोर; दीपक फरार

एक्स्ट्रामॅरिटल अफेअरमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याच्या घटना समोर येतात. अशातच ब्युटिशियन सोनिता शर्मा

Thane Rain Alert : गणेशोत्सवात पावसाची हजेरी! ठाण्यात IMD चा यलो अलर्ट; पुढील २४ तास महत्त्वाचे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावण्यास

Bollywood News : करीना कपूरचा ‘दायरा’ की कुणाल खेमूचा ‘व्हाइब’? दोन्ही सिनेमांना ‘A’ सर्टिफिकेट; १८ सप्टेंबरला कोण मारणार बाजी?

मुंबई : करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेला मेघना गुलजार दिग्दर्शित ‘दायरा’ आणि