नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग : नांदोस येथील शिवकालीन गढीचे पुरातत्वीय उत्खनन पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत असून या उत्खननात नवनवीन माहिती समोर येते आहे. आज उत्खनन स्थळाची राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांनी पाहणी करुन कामकाजाचा आढावा घेतला.


माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड आशिष शेलार दोन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून आज त्यांनी जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. यावेळी त्यांनी कुडाळ येथील पंचायत समिती कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले. यावेळी आमदार निलेश राणे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत कुडाळमधील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी सर्व विधी पदवीधरांशी संवाद साधून, त्यांचे अभिनंदन केले. विधी शिक्षणात उत्तम दर्जा जपल्याबद्दल कॉलेज व्यवस्थापनाचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी आमदार निलेश राणे, पुण्याच्या डी.ई.एस. नवलमल फिरोदिया, लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सुनीता आढाव, म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक डॉ. तारक आरोलकर, व्हिक्टर डांटस फाउंडेशनचे अध्यक्ष व्हिक्टर एफ. डांटस कॉलेजच्या प्राचार्य शिल्पा मार्गज, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे आणि कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर उपस्थित होत्या.


सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित आधार किट वाटप उपस्थित राहून सेवा केंद्राचे वितरण केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, सांस्कृतिक विभाग अजय पाटील, दिग्दर्शक दिपक कदम, तहसीलदार सचिन पाटील आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर त्यांनी कट्टा येथील शतक महोत्सवी कट्टा पंचक्रोशीत शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमातही सहभागी झाले त्यांच्या हस्ते कला दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा