Mumbai Metro 5 : भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो; 'ऑरेंज मेट्रो लाइन ५' साठी नवी डेडलाईन जाहीर!

ठाणे : दहिसर-काशीगाव मेट्रोच्या यशानंतर आता ठाणे शहरात धावणाऱ्या 'ऑरेंज लाईन' मेट्रो ५ च्या कामाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ठाणे-भिवंडी मेट्रो प्रकल्पासाठी आता नवी डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मेट्रोचे काम येत्या डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तांत्रिक चाचण्या आणि सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर, जानेवारी २०२७ मध्ये ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे. या मेट्रोमुळे ठाणे आणि भिवंडीतील प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार आहे.



दहिसर-काशीगाव मेट्रोनंतर आता ठाणे-भिवंडी मेट्रोची प्रतीक्षा


नुकत्याच सुरू झालेल्या दहिसर-काशीगाव मेट्रोला प्रवाशांनी डोक्यावर घेतले असून, स्थानकांवर लागणाऱ्या रांगांवरून ठाणेकरांची मेट्रोची ओढ स्पष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, गेली अनेक वर्षे रखडलेल्या ठाणे-भिवंडी मेट्रोची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. सध्या या मार्गावर प्रवाशांना अनियमित बस सेवा आणि वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास दिवा स्थानकावरून मोजक्याच 'मेमू' गाड्या उपलब्ध असल्याने प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे ठाणे-भिवंडी मेट्रो मार्ग तातडीने सुरू झाल्यास लाखो प्रवाशांना तासाभराच्या कोंडीतून आणि बसच्या विलंबातून मोठी मुक्ती मिळणार आहे.


मार्ग कसा असणार ?


ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांना जोडणाऱ्या २५ किमी लांबीच्या मेट्रो ५ (ऑरेंज लाईन) प्रकल्पाने आता वेग घेतला आहे. यातील पहिल्या टप्प्यात ठाणे ते भिवंडी दरम्यानचे काम प्राधान्याने पूर्ण केले जात आहे. सध्या भिवंडीतून मुंबईला जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना ठाणे किंवा कल्याणमार्गे बसने प्रवास करावा लागतं. मात्र, मेट्रो सुरू होताच हा त्रास कायमचा संपणार आहे. भाजप आमदार महेश चौघुले यांच्या उपस्थितीत भिवंडी महापालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच कामाची पाहणी केली. या पाहणीनंतर, तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात असून डिसेंबर २०२६ पर्यंत हा मार्ग पूर्णपणे तयार होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे ठाणे आणि भिवंडी दरम्यानचा प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आहे.
Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण