Asha Bhosle : दुसरा जन्म मिळाला तर, पुन्हा आशा भोसलेच व्हायला आवडेल का?

गायिका आशा भोसले यांना एकदा मुलाखतीमध्ये विचारलेले की, दुसरा जन्म मिळाला तर तुम्हाला आशा भोसलेच व्हायला आवडेल का? यावर त्या म्हणालेल्या, “हो… मला पुढच्या जन्मातही आशा भोसलेच व्हायला आवडेल. या जन्मात माझ्या राहिलेल्या गोष्टी पुढच्या जन्मात मी नक्की पूर्ण करेन. काय माहितीये, शिक्षण.… मला शिक्षण कमी मिळालं, त्यामुळे फॉरेनमध्ये माझं गाणं गेलं नाही.

मला असं वाटतं की, आपलं गाणं मी फॉरेनला नेलं असतं आणि ते खूप हिट झालं असतं. अशा खूप गोष्टी आहेत, ज्या कराव्याशा वाटतात; त्या सर्व मी माझ्या दुसऱ्या जन्मात जाऊन पूर्ण करेन.” या उत्तरानंतर आशा भोसले यांनी त्यांच्या लग्नाबद्दलही वक्तव्य केलं होतं. “अशा खूप गोष्टी आहेत, ज्या मी दुसऱ्या जन्मात पूर्ण करेन”, हे म्हटल्यानंतर त्या लगेच, “पण मी लग्न करणार नाही…”, असं म्हणाल्या होत्या. शेवटची ओळ म्हटल्यानंतर आशा भोसले स्वत:च मोठ्याने हसल्या होत्या.

वय हे फक्त एक आकडा आहे

आशा भोसले यांनी त्यांच्या ९० व्या वाढदिवशी दुबईमध्ये एका संगीत मैफिलीत सादरीकरण केले. या कार्यक्रमाबाबत मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आशा भोसले म्हणाल्या - वय हे फक्त एक आकडा आहे. वय वाढते, पण हृदय नेहमीच तरुण राहते. या वयातही मी उभी आहे, गाणी गात आहे आणि अजूनही माझ्या मुलांसाठी जेवण बनवत आहे.
कामासोबतच कुटुंब ही माझी पहिली प्राथमिकता होती. आयुष्यात मी खूप अडचणींचा सामना केला आहे. मी एकटीने तीन मुलांना वाढवले आणि त्यांची लग्ने केली. मी कामावरून पळून घरी येऊन जेवण बनवायचे, पण याचा माझ्या कामावर कधीच परिणाम झाला नाही. या सर्व गोष्टी सर्वांना माहिती आहेत, म्हणूनच सगळे मला ताई म्हणतात.
Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी