Pandharpur Acid attack : धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर अॅसिड हल्ला; आरोपी फरार

- राज्यात वाढत्या अत्याचारांमुळे नागरिकांचा संताप


राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकीकडे अशोक खरात प्रकरणामुळे संतापाची लाट उसळलेली असतानाच, दुसरीकडे अहिल्यानगरमधील अॅसिड हल्ल्याचे प्रकरण अद्याप ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूर (Pandharpur) येथे एका तरुणीवर अॅसिड हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


शिर्डी तालुक्यातील अॅसिड हल्ल्यातील आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही, त्यातच पंढरपुरातील या नव्या घटनेने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. २१ वर्षीय वैष्णवी भागवत असे पीडित तरुणीचे नाव असून, अज्ञात इसमाने तिच्यावर अॅसिडसदृश द्रव फेकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तिला तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.


दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पंढरपूर दौरा सुरू असतानाच ही घटना घडल्याने प्रशासनातही खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मात्र, आरोपी अद्याप फरार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.



घटनेनंतर पीडितेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. “आम्हाला फोन आला आणि आम्ही पेट्रोल पंपाजवळ पोहोचलो, तेव्हा माझ्या मुलीवर अॅसिड टाकल्याचं समजलं. अशा प्रकारचे कृत्य कुणावरही होऊ नये,” असे भावनिक आवाहन पीडितेच्या आईने केले.


दरम्यान, जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धनगर समाजातील मेंढपाळ आणि एका महिलेला काठीने मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी