Ashok Mittal ED : आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे उपनेते अशोक मित्तल यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी; राजकीय वातावरण तापलं

आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे उपनेते अशोक मित्तल (Ashok Mittal ED) यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. आज म्हणजेच बुधवार १५ एप्रिल सकाळपासूनच ईडीने हे छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. गुरुग्राम, जालंधर आणि पंजाबमधील तब्बल ८ ते ९ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.



मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी ही छापेमारी :


मिळालेल्या माहितीनुसार, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीशी संबंधित निधीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी ही छापेमारी करण्यात आली. यामध्ये मित्तल यांच्या मुलाच्या काही ठिकाणांचाही समावेश असून, ईडीचे पथक महत्त्वाचे कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे तपासत आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, विद्यापीठाशी संबंधित आर्थिक व्यवहार, निधीचा संभाव्य गैरवापर आणि परदेशी चलन नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची चौकशी सध्या ED करत आहे. या संदर्भात गुंतवणूक आणि देणग्यांबाबतही तपास सुरू आहे.



दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया देत, ही पंजाब निवडणुकांपूर्वीची राजकीय कारवाई असल्याचा आरोप केला आहे. “पंजाबमध्ये निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, पण जनता याला योग्य उत्तर देईल,” असा इशाराही त्यांनी दिला.


महत्त्वाची बाब म्हणजे, अशोक मित्तल यांची नुकतीच AAP कडून राज्यसभेत उपनेते (Deputy Leader) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी या पदावर राघव चड्ढा यांची जागा घेतली होती. त्यामुळे या छापेमारीला अधिक राजकीय रंग चढला आहे.


दरम्यान, ED सूत्रांनी स्पष्ट केलं आहे की ही कारवाई ठोस माहिती आणि आर्थिक अनियमिततेच्या पुराव्यांच्या आधारेच करण्यात आली आहे. एकूणच, या प्रकरणामुळे आता राजकारण तापलं असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक