Bigg Boss Marathi 6 : ग्रँड फिनाले सोहळा १९ एप्रिल रोजी

मुंबई : शंभर दिवसांचा प्रवास, प्रतीक्षा संपणार, अटीतटीच्या सामन्यातून महाराष्ट्राला महाविजेता मिळणार. आता उत्कंठावर्धक वातावरणात ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ आपल्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. बिग बॉस मराठी सिझन ६ ग्रँड फिनाले सोहळा १९ एप्रिल रात्री ८ ते रात्री ११ वा कलर्स मराठी आणि जिओ हाॅटस्टारवर रंगणार आहे.


प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या पर्वातील टॉप ५ स्पर्धक – राकेश बापट, अनुश्री माने, तन्वी कोलते, दीपाली सय्यद आणि विशाल कोटियन आता अंतिम लढतीसाठी सज्ज झाले आहेत. मैत्री, संघर्ष, भावना आणि अनपेक्षित वळणांनी सजलेल्या या प्रवासाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले असून, आता सर्वांची नजर एका क्षणावर खिळली आहे; कोण उचलणार या सिझनचा किताब? याच भव्य सोहळ्यात रितेश देशमुख यांचा दमदार परफॉर्मन्सही पाहायला मिळणार असून, त्यांच्या खास अंदाजाने या संध्याकाळची रंगत अधिक खुलणार आहे. १९ एप्रिलला मनोरंजनाच्या महासंग्रामाचा बादशहा ठरणार. बिग बॉस मराठी सिझन ६ ग्रँड फिनाले १९ एप्रिल रात्री ८ ते रात्री ११ वा कलर्स मराठी आणि जिओ हाॅटस्टारवर!



या भव्य सोहळ्यात केवळ विजेत्याची घोषणा होणार नाही, तर मनोरंजनाचा एक अद्वितीय जल्लोष रंगणार आहे. TOP 5 चे दमदार परफॉर्मन्सेस, घरातील अविस्मरणीय क्षणांचा आढावा आणि अनेक सरप्राइज एलिमेंट्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्समुळे या फिनालेची रंगत अधिकच खुलणार आहे, ज्यामुळे हा सोहळा आणखी संस्मरणीय ठरेल. अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या प्रत्येक स्पर्धकाची कहाणी ही केवळ खेळापुरती मर्यादित नसून ती जिद्द, संयम आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रेरणादायी प्रवास आहे.


महाराष्ट्राच्या जनतेला 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून मनोरंजनाची नवी पर्वणी मिळाली. एक अविस्मरणीय पर्व, असंख्य आठवणी आणि प्रेक्षकांच्या भरभरून प्रेमाने सजलेला हा प्रवास आता आपल्या भव्य शेवटाकडे वाटचाल करतो आहे. ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, कोण होणार विजेता हे १९ तारखेला अखेर ठरणार आहे या सीझनचा कोण विजेता होणार आणि 'बिग बॉस मराठी'च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’