Elite Guard : मंत्रालयाला आता ‘एलिट गार्ड’चे अभेद्य कवच

‘तिहेरी’ सुरक्षा व्यवस्था; मुख्य प्रवेशद्वारावर ‘एके-४७’सह कमांडो तैनात


मुंबई : राज्याचे मुख्य प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या संरक्षणासाठी आता महाराष्ट्र पोलिसांच्या अत्यंत प्रशिक्षित अशा 'एलिट गार्ड' या विशेष कमांडो तुकडीचे संरक्षक कवच देण्यात आले आहे. हे कमांडो आधुनिक शस्त्रास्त्रांसह मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तैनात केले जाणार आहेत.



मुंबईतील महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि संवेदनशील ठिकाणे दहशतवाद्यांच्या लक्ष्यस्थानी असल्याच्या गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयात दररोज हजारो नागरिक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असते, त्यामुळे येथील सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. आता मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि गार्डन गेटवर 'एलिट गार्ड'चे कमांडो सदैव सज्ज असणार आहेत.


डोळ्यांवर काळा गॉगल, अंगावर विशेष गणवेश आणि हातात 'एके-४७' सारखे अत्याधुनिक शस्त्र घेऊन हे कमांडो संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवतील. विशेष म्हणजे, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असलेल्या या कमांडोंचे एक बोट सदैव बंदुकीच्या 'ट्रिगर'वर असते.



मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था यापूर्वीच कडक होती, मात्र आता एलिट गार्डच्या समावेशामुळे येथे तिहेरी सुरक्षा कवच निर्माण झाले आहे. स्थानिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) आणि आता एलिट गार्ड अशा स्तरांवर मंत्रालयाची तपासणी आणि देखरेख केली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही विशेष फोर्स आता मंत्रालयात कायमस्वरूपी तैनात करण्यात आली असून, प्रवेशद्वारावरील प्रत्येक हालचालीची बारकाईने नोंद घेतली जात आहे.



काय आहे ‘एलिट गार्ड’?


एलिट गार्ड ही पोलीस दलातील एक विशेष निमलष्करी तुकडी आहे. दहशतवादी कारवाया मोडून काढणे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना संरक्षण देणे आणि अत्यंत गोपनीय व कठीण मोहिमा फत्ते करण्याचे विशेष प्रशिक्षण या जवानांना दिले जाते. गनिमी काव्याने होणारे हल्ले परतवून लावण्यात हे कमांडो निष्णात मानले जातात.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर