Sahar Shaikh Mumbra AIMIM : कैसा हराया... एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख गोत्यात! बनावट जात दाखल्याने पालिकेची खुर्ची धोक्यात ?

ठाणे : जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ज्यांच्या 'कैसा हराया...' या डायलॉगची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली, त्या एमआयएमच्या मुंब्र्यातील फायरब्रँड नगरसेविका सहर शेख आता मोठ्या कायदेशीर पेचात अडकल्या आहेत. सहर शेख यांनी चक्क शासकीय यंत्रणांची दिशाभूल करून बनावट जातीचा दाखला मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, यामुळे त्यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. मुंब्रा प्रभाग क्रमांक ३० मध्ये विजयाचा गुलाल उधळणाऱ्या सहर शेख यांच्या निवडीवर आता संशयाचे ढग जमा झाले आहेत; निवडणूक लढवण्यासाठी अनिवार्य असलेले जात प्रमाणपत्र मिळवताना त्यांनी कायदेशीर नियमांना धाब्यावर बसवल्याचे धक्कादायक वास्तव उघड होत आहे. तक्रारीनुसार, शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून हे प्रमाणपत्र मिळवले. मात्र, हे करताना त्यांनी एका नव्हे, तर चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे हा दाखला लाटल्याचा दावा आता केला जात आहे.



नेमके प्रकरण काय?


ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख या आता मोठ्या कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. सहर शेख यांनी निवडणूक लढवण्यासाठी सादर केलेल्या जातीच्या दाखल्याबाबत आणि त्यांच्या वास्तव्याबाबत प्रशासनाची दिशाभूल केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांनी स्वतःची जात आणि रहिवासी पुराव्यांबाबत चुकीची माहिती देऊन महाराष्ट्रातील जातीचा दाखला मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी आता रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे. जर जात पडताळणी समितीने किंवा न्यायालयाने हा दाखला अवैध किंवा बनावट ठरवला, तर सहर शेख यांच्यावर नगरसेवक पद गमावण्याची आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. मुंब्र्यातील या हायप्रोफाईल नगरसेविकेची राजकीय कारकीर्द आता या चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.



'कैसा हराया' म्हणणाऱ्या सहर शेख आता काय उत्तर देणार?


निवडणुकीच्या निकालानंतर सहर शेख यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यात त्या विरोधकांना डिवचताना 'कैसा हराया' असा सवाल करत होत्या. मात्र, आता हाच सवाल त्यांच्या निवडीवर उपस्थित झाला आहे. प्रशासनाची दिशाभूल करून लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर आता कडक कारवाई होणार का? मुंब्र्यातील या 'हायप्रोफाईल' नगरसेविकेचा राजकीय प्रवास या प्रकरणामुळे थांबणार का? याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



'नमुना ८' चा वापर करून प्रशासनाची फसवणूक केल्याचा आरोप


सिद्दिकी अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सहर शेख यांचे वडील युनूस यांनी प्रशासकीय नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप आहे. नियमानुसार स्थलांतरितांसाठी 'नमुना १०' लागू असताना, त्यांनी जाणीवपूर्वक 'नमुना ८' चा वापर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केली आणि बनावट दाखला मिळवला, असा दावा तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत ठाणे तहसीलदारांनी सुनावणी सुरू केली आहे. १८ मार्च रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीला युनूस यांनी प्रकृतीचे कारण देत दांडी मारली, मात्र त्यांच्या वकिलांनी कागदपत्रे सादर केली. त्यानंतर २३ मार्चला झालेल्या दुसऱ्या सुनावणीत तहसीलदारांनी या प्रमाणपत्रातील अनेक तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवले आहे. विशेष म्हणजे, सहर शेख या ठाण्याच्या रहिवासी असताना त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र का काढले? या हेतूवरही आता संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर सहर शेख किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.



कोण आहेत सहर शेख?


ठाणे महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या सहर शेख हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकीत सहर शेख यांनी मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएमच्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवला. मुंब्रा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) बालेकिल्ला मानला जात असला, तरी सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांनी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांना थेट आव्हान दिले होते. निवडणुकीच्या प्रचारात आव्हाडांवर केलेल्या सडकून टीकेमुळे सहर शेख अल्पावधीतच प्रकाशझोतात आल्या. मात्र, आता त्याच 'जायंट किलर' ठरलेल्या नगरसेविका आपल्या जात प्रमाणपत्राच्या वादामुळे कायदेशीर अडचणीत सापडल्या आहेत.

Comments
Add Comment

Nashik : गणेशोत्सवापूर्वी नाशिक पोलिस ॲक्शन मोडमध्ये ! नाशिकमध्ये मुक्काम असलेल्या तडीपार गुन्हेगारांची ‘धरपकड’ मोहीम

Nashik : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी