Fastag : 'फास्टॅग' चा जुगाड पडणार महागात; वसुलीत फेरफार करणाऱ्यांवर....

मुंबई : भारतातील अनेक महामार्गांवर टोल वसुली सुलभ करण्यासाठी फास्टॅग चा वापर केला जातो. इंधनाची बचत, वेळेची बचत, आणि पद्धतशीर टोलची वसुलीसुद्धा, याच टोलवसुलीमध्ये सुद्धा लोक जुगाड करून आपले पैसे वाचवत आहेत. वाहनचालक पैसे वाचवण्यासाठी फास्टॅग च्या स्कॅनर मध्ये जुगाड करत आहेत. सर्रासपणे चाललेली ही गोष्ट पटकन कोणाच्या लक्षात येण्यासारखी नसते त्यामुळे अनेक गैरप्रकार टोल वसुलीद्वारे केले जात आहेत.




अशी केली जाते गडबड


काचेवर स्कॅनर न चिटकवणे : अनेक वाहनांवर, काचेवर फास्टॅग बऱ्याचवेळी नसतो. तो हातात धरून किंवा प्लॅस्टिकमध्ये असतो, त्यामुळे टोल वसुली करणाऱ्यांना तो टॅग कोणत्या गाडीचा आहे यावर त्यांची चटकन नजर जात नाही.


दुसऱ्या गाडीचा टॅग वापरला जातो : कारसाठी असलेला फास्टॅग मोठ्या वाहनांवर म्हणेजच ट्रक किंवा बस वर चिटकवून कमी टोल भरण्याचा प्रयत्न केला जातो.


फास्टॅग झाकून ठेवला जातो : कॅमेऱ्या टॅग स्कॅन करू शकणार नाही अशा पद्धतीने टॅगवर सेलोटेप किंवा इतर काहीतरी लावले जाते, जेणेकरून तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन कमी तोल भरण्याचा प्रयत्न केला जातो.




'नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया' ने फास्टॅग चे नियम केले कडक


टोल वसुली चुकवणाऱ्यांना किंवा काही कारण सांगून टोल कमी करायला लावणार असल्यास त्यांना आता दुप्पट दंड ठोठावण्याचा कायदा नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया ने केला आहे. जर फास्टॅग स्कॅन झाला नाही किंवा त्यात काही फेरफार आढळला तर नियमानुसार चालकाला दुप्पट तोल भरावा लागू शकतो. आणि असे वारंवार घडल्यास तुमचा फास्टॅग हा कायमचा बंद केला जाऊ शकतो. त्यामुळे योग्य टोल भरणं आणि फास्टॅगची व्यवस्थित काळजी घेणं तुमची जबाबदारी आहे

Comments
Add Comment

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून 'मुंबई बँक' जिंकण्याची जबाबदारी उपमहापौरांकडे

- वर्ष अखेरीस निवडणूक; प्रवीण दरेकर आणि संजय घाडी हे मित्र येणार आमनेसामने मुंबई (सुहास शेलार) : ठाणे जिल्हा

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही