Vinod Kambli : मैदानातील हिरो, आयुष्याच्या खेळपट्टीवर हतबल! माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ब्रेनस्ट्रोकचा धोका

आपल्या निर्भीड शैली, आकर्षक रूप आणि क्रिकेटच्या मैदानातील स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा विनोद कांबळी सध्या खऱ्या आयुष्यात एका अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत. एकेकाळी आपल्या प्रतिभेने लाखो लोकांचे मन जिंकणाऱ्या कांबळींची सध्याची अवस्था कोणालाही कळवळायला लावणारी आहे. पण, दिलासादायक बाब ही आहे की या कठीण काळात तो एकटा नाही, त्यांचे जवळचे मित्र त्यांच्या प्रकृती सुधारण्याची आशा बाळगून आहेत.


कांबळीचा जवळचा मित्र, मार्कस कुटो म्हणाला, "सुमारे एक वर्षापूर्वी कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ आढळली होती, ज्यावर उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या मते, ही गाठ पूर्णपणे काढता येत नाही, त्यामुळे भविष्यात त्याला पक्षाघाताचा धोका आहे. सध्या तो चालू शकतो, पण त्याची स्मरणशक्ती पूर्वीसारखी तल्लख नाही आणि तो अनेक गोष्टी विसरतो."



कांबळीने दारू पूर्णपणे सोडली आहे, हे एक सकारात्मक चिन्ह आहे. पण, धूम्रपान त्याच्या आरोग्यासाठी एक मोठा धोका आहे. डॉक्टर आणि मित्रांच्या मते, जर त्याने हे सोडले नाही, तर त्याला भविष्यात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.



मी कांबळीच्या मित्रांचा एक WhatsApp Group बनवला आहे. या ग्रुपमध्ये बहुतांश क्रिकेटपटू आहेत. हे क्रिकेटपटू आपली ओळख न सांगता कांबळीसाठी आर्थिक मदत करत आहेत”, असं कुटो यांनी सांगितलं.


गेल्या वर्षी, प्रकृती अचानक खालावल्याने कांबळीला ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला लघवीचा संसर्ग आणि स्नायूदुखीचा त्रास होत होता. तपासणीदरम्यान त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ आढळून आली. त्यांच्यावर सुमारे दोन आठवडे उपचार करण्यात आले, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर कांबळी यांनी आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने लोकांना दारू आणि अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले, कारण वाईट सवयी आयुष्य उद्ध्वस्त करतात.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम