Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जोर धरणार; तर या राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार

मुंबई : हिवाळा संपला आणि उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाचा पारा इतका चढलाय की उष्माघाताने लोक आपल्या जीवाला मुकत आहेत. काही दिवसांआधी पुण्यात हिंजवडी परिसरात गारा पडल्या आणि वातावरणात थंडावा निर्माण झाला. त्यानंतर पुन्हा उष्णतेचा पारा चढला तो अगदी ४० अंशापर्यंत जाऊन पोहोचला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात वातावरण बदलाचा फटका जाणवत आहे. काही भागांमध्ये वादळी वारे आणि पाऊस आहे तर काही ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे पिकांची नासाडी झाली आहे.



हवामान विभागाचा इशारा


बदलत्या वातावरणावर हवामान विभागाने २१ एप्रिलपर्यंत अंदाज व्यक्त असून उष्णेतची लाट आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे. यानुसार महाराष्ट्रासह १३ राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


https://prahaar.in/2026/04/16/tcs-conversion-gang-used-to-inflict-torture-male-employee-makes-revelation-accused-said-send-wife-with-me/

या राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणि मांडलेल्या तारखांनुसार मध्य महाराष्ट्रात १६ ते १८ एप्रिल आणि मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिल दरम्यान लाट येण्याचा अंदाज आहे. १६ ते १९ एप्रिल दरम्यान मध्य प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारपट्टीवरील कर्नाटक तसेच केरळ माहे येथे काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तसेच १६ ते १९ एप्रिल दरम्यान छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात १६ ते २१ एप्रिल दरम्यान लाटेचा इशारा दिला आहे. तर गुजरात राज्याच्या किनारपट्टीतील भागांना देखील या उष्णतेचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.


भारतावर पश्चिमी वाऱ्यासह एका पश्चिमी प्रणाली सक्रिय असल्याने १६ एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर एक नवीन परंतु कमकुवत पश्चिमी प्रणाली येण्याची शक्यता आहे. यामुळेच वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात कमल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याहची शक्यता आहे. मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसह दमट हवामानाची शक्यता आहे.



या आठ राज्यांना आहे पावसाचा इशारा


मध्य महाराष्ट्रात १८ ते २१ एप्रिल दरम्यान ३० - ४० किमी वेगाने वारे वाहणार असून हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ईशान्य भारतातील आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये १६ ते १९ एप्रिल दरम्यान हलक्या पावसाची शक्यता असून ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हीच स्थिती नागालँड, मणिपूर, मिझोराम, आणि त्रिपुरामध्ये देखील राहणार आहे. यासोबतच राज्याच्या सर्व भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपिठीचीही शक्यता असल्याने शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने