Mathadi Workers : कंबरतोड ओझ्यापासून माथाडी कामगारांची सुटका

बाजार समित्यांसाठी राज्य सरकारचे नवे नियम; ५० किलोची मर्यादा बंधनकारक


मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये राबणाऱ्या माथाडी कामगारांच्या आरोग्याचा विचार करून राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कांदा, बटाटा व इतर शेतमालाच्या गोणीचे वजन ५० किलोपेक्षा जास्त असू नये, असे स्पष्ट आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिले आहेत. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांचा भार उचलणाऱ्या कामगारांचा भार काहीसा हलका होणार आहे.




आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या कन्व्हेन्शन क्र. १२७ नुसार, कोणत्याही कामगाराकडून ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करून घेऊ नये, असा नियम आहे. केंद्र सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारला सूचित केले होते. त्यानुसार कामगार आयुक्तांनी २००० सालीच परिपत्रक काढले होते, मात्र बाजार समित्यांमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. अखेर, विविध कामगार संघटनांच्या मागणीनंतर १ एप्रिल २०२६ रोजी पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गुरुवार, दि. १६ एप्रिल रोजी याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला.


त्यानुसार, बाजार समित्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार समित्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये शेतमालाच्या गोणीचे वजन ५० किलोपर्यंतच ठेवण्याबाबत जनजागृती करावी, व्यापाऱ्यांनी ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या भरू नयेत, अशा स्पष्ट सूचना त्यांना देण्यात याव्यात, या नियमाबाबत बाजार समिती आवारात पुरेशी प्रसिद्धी करण्यात यावी, जेणेकरून सर्वांना याची कल्पना येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित


या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी बाजार समितीचे सचिव, जिल्हा उपनिबंधक आणि पणन संचालक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही वजन मर्यादा लागू करताना बाजार समितीचे दैनंदिन कामकाज प्रभावित होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत. या प्रक्रियेचा वेळोवेळी अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.