Minister Shivendrasinharaje Bhosale : सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची घरे होणार अधिक प्रशस्त

चटई क्षेत्रफळात वाढ; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा निर्णय


मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. बदलती जीवनशैली आणि वाढत्या गरजा लक्षात घेऊन शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात (कार्पेट एरिया) वाढ करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी जाहीर केला. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता अधिक आधुनिक आणि प्रशस्त घरे उपलब्ध होणार आहेत.


सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार विविध गटांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे क्षेत्रफळ नव्याने निश्चित करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) निर्गमित केला असून, उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेनंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.



सुधारित आराखड्यानुसार, ही निवासस्थाने टाईप-ए ते टाईप-जी अशा विविध श्रेणींमध्ये विभागली आहेत. उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी २४० चौरस मीटरपर्यंत, तर निम्न वेतनगटातील कर्मचाऱ्यांसाठी किमान ४५ चौरस मीटर क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे. नवीन रचनेत बैठकीची खोली, स्वतंत्र भोजनकक्ष, शयनकक्ष, आधुनिक स्वयंपाकघर आणि बाल्कनीचा समावेश असेल. विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांत कार्यालयीन कक्ष, अभ्यासिका आणि सेवक कक्षही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.



आधुनिक सुविधांवर भर


केवळ जागेत वाढ न करता सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. प्रत्येक खोलीत इंटरनेट आणि दूरध्वनी सुविधेसाठी स्वतंत्र पॉइंट्स दिले जातील. बहुमजली इमारतींमध्ये जिने, कॉरिडॉर आणि सामाईक सोयींसाठी स्वतंत्र जागा राखून ठेवली जाईल, जेणेकरून घराच्या मुख्य क्षेत्रफळावर त्याचा परिणाम होणार नाही. हा निर्णय केवळ नव्याने सुरू होणाऱ्या बांधकाम प्रकल्पांसाठी लागू असेल. सध्या बांधकामाधीन असलेल्या किंवा पूर्ण झालेल्या इमारतींच्या रचनेत कोणताही बदल केला जाणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांना आधीच निवासस्थाने वाटप झाली आहेत, त्यांच्या श्रेणीमध्ये कोणताही बदल होणार नाही.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर