Raghav Chadha : राघव चड्ढांना दुहेरी धक्का! पक्षाने पदावरून हटवल्यानंतर आता सुरक्षा देखील काढून घेतली

पंजाब सरकारने आम आदमी पक्षाचे माजी खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांची सुरक्षा काढून घेतली आहे. आम आदमी पक्षाने अलीकडेच एक मोठा संघटनात्मक बदल करत, आपले राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवले. त्यांच्या जागी डॉ. अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता राघव चड्ढा यांची सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. 'आप'चे नेते सौरभ भारद्वाज यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की, केंद्र सरकार राघव चड्ढा यांना सुरक्षा पुरवणार आहे.



राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवताना, आम आदमी पक्षाने त्यांच्यावर पंजाबशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे संसदेत मांडण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. त्यांची "निष्क्रियता" पक्षाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगत पक्षाने त्यांच्यावर टीका केली. यावर राघव यांनू प्रत्युत्तर देत म्हटले होते की, 'नानकाना साहिब कॉरिडॉर' आणि 'बठिंडा ट्रेन' संदर्भात राज्यसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांशी संबंधित व्हिडिओ त्यांनीही सोशल मीडियावर शेअर केला होता.



यापूर्वी, २ एप्रिल रोजी आम आदमी पक्षाने राघव चड्ढा यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवले. त्यांच्या जागी पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाने राज्यसभा सचिवालयाला असेही कळवले की, चड्ढा यांना यापुढे पक्षाच्या कोट्यातून बोलण्याचा वेळ दिला जाणार नाही. या निर्णयामुळे चड्ढा आणि पक्ष नेतृत्व यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण