Terrorist Amir Hamza : भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधार दहशतवादी अमीर हमजावर गोळीबार; प्रकृती गंभीर

- लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक सदस्य अमीर हमजा याच्यावर लाहोरमध्ये गोळीबार


पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT)चा संस्थापक सदस्य अमीर हमजा याच्यावर लाहोरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला आहे. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरमधील एका न्यूज चॅनलच्या कार्यालयाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून फरार झाले.



वर्षभरात दुसऱ्यांदा हल्ला :


गेल्या वर्षी मे महिन्यातही अमीर हमजावर त्याच्या लाहोरमधील घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळीही त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर पाकिस्तान प्रशासनाने त्याची सुरक्षा वाढवली होती, मात्र अधिकृत प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते.



कोण आहे अमीर हमजा?


१० मे १९५९ रोजी पंजाब प्रांतातील गुजरनवाला येथे जन्मलेला अमीर हमजा हा अफगाण जिहादचा अनुभवी सदस्य मानला जातो. १९८५-८६ दरम्यान त्याने हाफिज सईदसोबत मिळून लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची स्थापना केली होती. भारतासह जगभरातील अनेक दहशतवादी कारवायांशी त्याचा संबंध असल्याचे सांगितले जाते.



तो लष्कर-ए-तैयबामधील हाफिज सईदनंतरचा दुसरा महत्त्वाचा नेता मानला जातो. संघटनेच्या प्रचार यंत्रणा आणि संपर्क मोहिमांमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने त्याला दहशतवादी म्हणून घोषित करून निर्बंध घातले आहेत.



प्रचार आणि दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय भूमिका :


हमजा हा लष्करच्या विचारसरणीचा प्रमुख चेहरा मानला जातो. तो प्रभावी वक्ता आणि लेखक असून संघटनेच्या प्रचारासाठी सक्रिय होता. त्याने अनेक पुस्तके लिहिली असून 'काफिला दावत और शहादत' हे त्याचे पुस्तक विशेष चर्चेत राहिले. तसेच, तो संघटनेच्या ‘स्पेशल कॅम्पेन्स’ विभागाचे नेतृत्व करत होता, ज्याद्वारे निधी उभारणी आणि दहशतवादी कारवायांसाठी लोकांना प्रवृत्त केले जात होते.



लष्करपासून दूर? तरीही कारवाया सुरू


२०१८ मध्ये पाकिस्तान सरकारने लष्करच्या निधीवर कारवाई केल्यानंतर हमजाने संघटनेपासून काहीसे अंतर घेतल्याचे सांगितले गेले. त्यानंतर त्याने ‘जैश-ए-मन्काफा’ नावाचा स्वतंत्र गट स्थापन केला. मात्र, तो अजूनही लष्करसाठी निधी उभारणी करत असल्याचे आणि जम्मू-काश्मीरमधील कारवायांना पाठिंबा देत असल्याचे आरोप आहेत.



गोळीबारामागील कारण अस्पष्ट :


या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा दहशतवादी संघटनांमधील अंतर्गत संघर्ष किंवा टार्गेटेड हल्ल्यांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे