Indonesia helicopter crash : इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर कोसळून अपघात, आठ जणांचा मृत्यू

इंडोनेशियाच्या बोर्निओ बेटावर दोन पाम ऑइल प्लांटेशन दरम्यान उड्डाण करणारे हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात सर्व आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी आज म्हणजेच शुक्रवार १७ एप्रिल रोजी दिली.


एअरबस H130 मॉडेलचे हे हेलिकॉप्टर पीटी मॅथ्यू एअर नुसंतारा कंपनीचे होते. या हेलिकॉप्टरने गुरुवारी वेस्ट कालिमंतान प्रांतातील मेलावी जिल्ह्यातून उड्डाण केले होते. उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांतच त्याचा संपर्क तुटला. हे हेलिकॉप्टर कुबू राया जिल्ह्यातील दुसऱ्या पाम ऑइल प्लांटेशनकडे जात होते.



राष्ट्रीय शोध व बचाव संस्था आणि परिवहन मंत्रालयाच्या माहितीनुसार, शोध पथकांनी नंतर सेकाडाऊ जिल्ह्यातील दाट जंगलात हेलिकॉप्टरचा अवशेष शोधून काढला. त्यानंतर दोन कर्मचाऱ्यांसह सहा प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये एका मलेशियन नागरिकाचाही समावेश आहे.



सुमारे २७ कोटी लोकसंख्या असलेला इंडोनेशिया हा विशाल द्वीपसमूह देश असून, येथे वाहतूक अपघातांची समस्या कायम आहे. विमान, हेलिकॉप्टर दुर्घटना तसेच फेरीबोट बुडण्याच्या घटना येथे वारंवार घडत असतात.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे