Bigg Boss Marathi 6 : ड्रामा, टास्क आणि ट्विस्ट्सचा जल्लोष – बिग बॉस मराठी 6 मधील 5 अविस्मरणीय क्षण!

राडा ते रिअल इमोशन्स! बिग बॉस मराठी सीझन 6 चे 5 सुपरहिट क्षण


मुंबई : एंडेमोल शाइन इंडिया (बनिजे ग्रुपचा भाग) निर्मित बिग बॉस मराठी सीझन 6 हा सर्वात मोठा प्रसिद्ध लोकप्रिय रिअॅलिटी शो पैकी एक ठरला असून, त्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. रितेश देशमुख यांची दमदार आणि धारदार होस्टिंग या शोला महाराष्ट्रभर एक मोठं नाव मिळवून देण्यात बनवण्यात महत्त्वाची ठरली आहे. तुफान भांडणं, कठीण टास्क्स, हलके-फुलके क्षण आणि अनपेक्षित ट्विस्ट्स यामुळे हा सीझन सतत रोमांचक ठरला. घरातील सतत बदलणारे समीकरण, धमाकेदार एंट्रीज आणि मोठे वाद यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहिली.


सीझन 6 आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, ग्रँड फिनाले 19 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. भावना उंचावलेल्या आणि स्पर्धा शिगेला पोहोचलेली असताना, या सीझनला खास बनवणाऱ्या पाच अविस्मरणीय क्षणांकडे एक नजर टाकूया:



1) राखी सावंतची धमाकेदार एंट्री आणि त्यानंतरचा राडा


राखी सावंतने वाइल्डकार्ड एंट्री घेताच घरात अक्षरशः खळबळ उडवली.  राकेश बापट ला “एक्स-जिजू” म्हणण्यापासून ते पहिल्याच दिवशी घरकाम नाकारण्यापर्यंत, तिने घरात पूर्ण गोंधळ घातला. तिचे विनोदी टोमणे, सततचे चिथावणीखोर वर्तन आणि बदलणारे नातेसंबंध यामुळे खेळाची दिशा पूर्णपणे बदलली.



2) राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यातील मोठा वाद


नॉमिनेशन टास्कदरम्यान विशाल कोटियन आणि राकेश बापट यांच्यात झालेला वाद हा या सीझनमधील सर्वात धक्कादायक क्षणांपैकी एक होता. साध्या वादातून सुरू झालेली ही भांडणं वैयक्तिक विषयांपर्यंत पोहोचली—ज्यात घटस्फोट आणि वय यांसारख्या गोष्टी ओढल्या गेल्या. परिस्थिती इतकी बिघडली की ती हातघाईपर्यंत गेली, ज्यामुळे सर्वजण थक्क झाले आणि बिग बॉसला हस्तक्षेप करावा लागला.



3) फायनलिस्ट तन्वी कोलते ची ‘टास्क क्वीन’ कामगिरी


तन्वी कोलते ही या सीझनमधील पहिली फायनलिस्ट ठरली आणि तिने ‘टास्क क्वीन’ ही ओळख सार्थ ठरवली. जवळजवळ प्रत्येक टास्कमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी केली, दोन वेळा कॅप्टन बनली आणि संपूर्ण खेळात सातत्य राखले. तिची खासियत म्हणजे ताकदीसोबत बुद्धीचा वापर करून स्मार्ट गेम खेळणे.



4) दीपाली सय्यद - राखी सावंत यांची भन्नाट केमिस्ट्री


या सीझनमधील एक खास आकर्षण म्हणजे दीपाली सय्यद आणि राखी सावंत यांची अनोखी केमिस्ट्री. कधी तीव्र भांडणं तर कधी मजेशीर क्षण—त्यांचं नातं कायमच अनपेक्षित आणि मनोरंजक राहिलं. टास्कदरम्यानही त्यांची गोंधळलेली पण मजेशीर जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडली.



5) धक्कादायक एलिमिनेशन्स आणि फायनलिस्ट्स


बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये अनेक धक्कादायक एलिमिनेशन्स पाहायला मिळाले, विशेषतः “भाऊचा धक्का” दरम्यान, रेवा कौरसे संकेत पाठक, सागर कारंडे, करण सोनावणे, राखी सावंत यांसारख्या स्पर्धकांचे अनपेक्षित बाहेर पडणे प्रेक्षकांना सतत चकित करत राहिले.


सर्व ड्रामा आणि एलिमिनेशन्सनंतर, अंतिम पाच स्पर्धक—तन्वी कोलते,राकेश बापट , विशाल कोटियन, अनुश्री माने आणि दीपाली सय्यद यांनी फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे—ज्यामुळे आता ग्रँड फिनाले अधिकच रोमांचक होणार आहे!

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’