Fighter Jet Emergency Landing Pune : पुण्यात लढाऊ विमानाचे अचानक लँडिंग; करावे लागले चक्क विमानतळ बंद; नेमकं काय घडलं त्या रात्री?

पुणे : विमानाचा अपघात आता रस्ते अपघातासारखा सर्वसाधारण झालाय. काल पुण्याच्या धावपट्टीवर रात्री एक लढाऊ विमानाचे लँडिंग झाले आणि अचानक संपूर्ण रनवे च बंद करण्यात आला. सुदैवाने मोठा अपघात होता होता टळला.



नेमकं काय घडलं


पुण्याचा विमानतळ हवाई दल आणि नागरी विमानांच्या वापरासाठी वापरला जातो. शुक्रवारी रात्री १०.२५ च्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाचे पुण्याच्या विमानतळावर हार्ड लँडिंग झाले. विमानाच्या गिअर यामध्ये तांत्रिक बिघाड झाला, यामुळे विमानाला मोठा धक्का बसला. विमान धावपट्टीला घासले आणि मोठी आग लागली . सुदैवाने वैमानिक सुरक्षित असून कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेलं नाही.



केंद्रीय हवाई मंत्री काय म्हणाले?


केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळावरील धावट्टीवरील कामकाज थांबवण्यात आल्याची पुष्टी केली. एक्स वर पोस्ट करताना मोहोळ म्हणालेत की, "सुदैवाने विमानातील कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही विमान कंपन्यांना माहिती देण्यात आली असून धावपट्टीवरील कामकाज पूर्ववत होण्यासाठी काही तास लागू शकतात, परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात यावी यासाठी मी विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.



भारतीय हवाई दलाने एक्स वर पोस्ट करत सांगितले आहे की , ' भारतीय दलाच्या विमानाचा अपघात झाल्यामुळे पुणे धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. विमानातील कर्मचारी सुरक्षित असून कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याने शक्य तितक्या लवकर धावपट्टी पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने