Jofra Archer : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'!

कोलकाता : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात १५५ धावांचा बचाव करताना जोफ्रा आर्चरने राजस्थान रॉयल्सच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने टिम सिफर्टला शून्यावर माघारी धाडले. आयपीएलच्या हंगामात सलग तिसऱ्या सामन्यात जोफ्रा आर्चरने पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. या कामगिरीसह त्याने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा पहिल्या चेंडूवर विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर टिम सिफर्टला पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचित करण्याआधी जोफ्रा आर्चरनं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला 'गोल्डन डक'सह तंबूचा रस्ता दाखवला होता. आरसीबीच्या सामन्यात त्याने फिल सॉल्टवर हीच वेळ आणली होती. जोफ्रा आर्चरने आयपीएलमध्ये पहिल्या चेंडूवर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मोहम्मद शमीने १२४ सामन्यात पाच वेळा पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्याचा रेकॉर्ड आहे. यंदाच्या हंगामात सलग तीन सामन्यात पहिल्या चेंडूवर विकेट घेत जोफ्रा आर्चरने ५८ व्या सामन्यात पाच वेळा ही कामगिरी करून दाखवली आहे.

Comments
Add Comment

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन