Nashik Dwarka Chawk : नाशिकमधील हे चौक ३ महिने राहणार बंद; प्रवासाचे वेळेत करा नियोजन

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात आणि TCS कंपनी नंतर नाशिक आणखी एक कारणाने चर्चेत आहे ते म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा या कुंभमेळ्यासाठी गोदावरीच्या काठावर १२ नवीन घाट, ४०० एकर जागा आरक्षित करणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे आजपासून पुढील तीन महिने शहरातील द्वारका सर्कल बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




द्वारका चौक ३ महिने बंद


नाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा सुरु होणार आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांनी वेग धरला आहे. कुंभमेळा सुरु होण्याच्या आधी सगळी कामे पूर्ण व्हावीत असा हेतू आहे. त्यामुळे नाशिकचे प्रवेशद्वार समजला जाणारा 'द्वारका सर्कल' आजपासून पुढील तीन महिन्यांसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १८ जुलै पर्यंत हा परिसर निर्बंधाखाली राहणार असून, यामुळे नाशिकरांसह महामार्गावरील प्रवाशांची अडचणीत वाढ होणार आहे.



द्वारका सर्कल वरील कायमस्वरूपी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अंडरपासचे काम संथगतीने सुरु होते. मात्र कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनसमोर असल्याने आता या कामाला युद्धपातळीवर गती दिली जात आहे.


दरम्यान मुंबई - आग्रा महामार्ग आणि पुणे महामार्गावरून येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असून नागरिकांनी त्याचा वापर करावा असे प्रशासनसह आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी