Iran vs US : व्हायरल ऑडिओवरून नवा वाद; इराणने ट्रम्प यांना ‘इडियट’ संबोधल्याचा दावा

तेहरान : पश्चिम आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतील इराणी दूतावासाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका केली आहे. एका व्हायरल समुद्री ऑडिओ क्लिपवरून दूतावासाने ट्रम्प यांच्यावर निशाणा साधत वाद निर्माण केला आहे. हा संपूर्ण वाद त्या कथित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर सुरू झाला, ज्याला इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी) नौदलाचा रेडिओ संदेश असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओमध्ये ‘इडियट’ हा शब्द ऐकू येतो, ज्यावरून सोशल मीडियावर विविध दावे करण्यात आले. काहींनी तो शब्द इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसाठी वापरला असल्याचे म्हटले, मात्र इराणी दूतावासाने हे दावे फेटाळून लावले.

प्रिटोरिया येथील इराणी मिशनने ट्रम्प यांनाच ‘इडियट’ संबोधले असल्याचा दावा केला आहे. दूतावासाच्या मते, व्हायरल संदेशातील हा शब्द ट्रम्प यांच्यासाठी वापरण्यात आला होता, इराणच्या कोणत्याही अधिकाऱ्यासाठी नव्हता. व्हायरल ऑडिओमध्ये आयआयजीसी नौदलाने जहाजांना इशारा दिला आहे की होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे इराणच्या नियंत्रणाखाली आहे. समुद्री चॅनेल 16 वर जारी करण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे की, हा महत्त्वाचा मार्ग खुला करण्याचा निर्णय केवळ इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या आदेशानुसारच होईल, बाह्य दबावामुळे नाही. तसेच, या मार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या जहाजांना इराणी नौदलाची परवानगी घ्यावी लागेल, असेही सांगण्यात आले आहे.

आयआरजीसी ने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, कोणतेही जहाज परवानगीशिवाय सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर हल्ला केला जाऊ शकतो. विशेषतः इराणविरोधी देशांशी संबंधित जहाजांना हा इशारा देण्यात आला आहे. इराणने आरोप केला आहे की अमेरिकेने युद्धविरामाच्या अटींचे पालन केले नाही आणि इराणी जहाजे व बंदरांवरील निर्बंध हटवले नाहीत. याच प्रत्युत्तरात होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. यापूर्वी इराणने मर्यादित स्वरूपात गैर-लष्करी जहाजांना मार्ग देण्याची परवानगी दिली होती, मात्र आता ती व्यवस्थाही संपुष्टात आली आहे.

सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर आयआरजीसी ने परिसरातील सर्व जहाजांना हाय अलर्टवर राहण्याचा इशारा दिला आहे. फारसच्या आखातातून किंवा ओमान समुद्रातून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा ते शत्रूला सहकार्य मानले जाईल, असे सांगण्यात आले आहे.इराणने पुन्हा एकदा स्पष्ट केले की या भागातील नियम ठरवण्याचा अधिकार फक्त त्यांच्या नौदलाकडे आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक आहे, जिथून जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा मोठा हिस्सा जातो. त्यामुळे येथे वाढणारा तणाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि समुद्री व्यापारासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे