Vasai : वसईत मत्स्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निश्चिती करण्याचे मंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : पालघर जिल्ह्यातील वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा निश्चित करावी. या केंद्रासाठी आवश्यक जागा मागणीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवावावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.


पालघर जिल्ह्यातील वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे या विषयी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार स्नेहा दुबे, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते.


वसईतील केंद्रामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील यासाठी प्रकल्पाची अंमलबजावणी लवकर होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना ही एक महत्त्वाची योजना असून या योजनेच्या जनजागृतीसाठी शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त लाभार्थी पर्यंत ही योजना पोचवावी, अशा सूचना ही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. यानंतर मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत कोळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश गाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस पर्यटन विभागाचे सचिव संजय खंदारेही उपस्थित होते. बैठकीत मच्छी सुकविण्यासाठी जागा, जाळी व बोटी दुरुस्ती केंद्रे, कोळी खेड्यांचा विकास तसेच पर्यटनाला चालना देणारे प्रकल्प यावर चर्चा झाली. यावेळी 'बॅक वॉटर' प्रकल्पाच्या माध्यमातून आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पर्यटन विभाग व मत्स्य व्यवसाय विभागाकडे प्रस्ताव सादर करावा. याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांनी सर्व संबंधितांची बैठक घ्यावी असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. मच्छीमार संस्थांना मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती देण्यात यावी. त्यासाठी शिबिरांचेही आयोजन करण्यात यावे अशा सूचनाही मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांनी दिल्या.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन