Pachpadra Refinery Fire : पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाच्या आधीच पाचपद्रा रिफायनरीत भीषण आग; कार्यक्रमावर अनिश्चितता

राजस्थानमधील पाचपद्रा Pachpadra येथे उभारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित रिफायनरीत आज म्हणजेच सोमवार २० एप्रिल रोजी दुपारी अचानक भीषण आग लागली. विशेष म्हणजे, मंगळवार (२१ एप्रिल) रोजी सकाळी ११:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार होते. मात्र या घटनेमुळे आता उद्घाटनाच्या कार्यक्रमावर अनिश्चिततेचे सावट आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रिफायनरीच्या मुख्य प्रोसेसिंग युनिटपैकी एका भागात आग लागली. आगीची तीव्रता इतकी होती की, काळ्या धुराचे लोट सुमारे एक किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २० हून अधिक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग इतर युनिट्समध्ये पसरू नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.



आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य काही कारण आहे, याचा तपास तांत्रिक तज्ञ आणि सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात घातपाताची शक्यता अधिक असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अवघ्या २४ तास आधी ही घटना घडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. कडक सुरक्षा व्यवस्था असूनही आग लागल्याने व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून, झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतरच उद्घाटन सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि