BMC News : नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक नामंजूर, महापालिका सभागृहात तीव्र पडसाद

विरोधी पक्षांचा तीव्र शब्दांत केला निषेध


मुंबई : महिलांना योग्य प्रमाणात सर्व विधी मंडळात, विधानसभा, लोकसभा या ठिकाणी प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम या विधेयकाला बहुमताने नामंजूर करण्यात आल्याने याचा निषेध करण्यात आले. काँग्रेस आणि उबाठासह इतर विरोधी पक्षांचा समाचार घेत भाजपने तीव्र निषेध करत महिलांच्या सक्षमीकरणा प्रवाह आम्ही रोखू शकत नाही. आम्ही महिलांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा सभागृहात देण्यात आला.


मुंबई महापालिका सभागृहात सभागृहनेते गणेश खणकर यांनी संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम या विधेयकाला बहुमताने नामंजूर करण्यात आल्याने तसेच तसेच विधेयकाला विविध कारणे पुढे कयन विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा निषेधाचे निवेदन सभागृहात केले. यावर काँग्रसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी विधेयक का नामंजूर करण्यात आले याची कारण देत पक्षाने महिलांना प्राधान्य दिले.म्हणून काँग्रेसचे नेतृत्व आले होते,असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपच्या राजेश्री शिरवडकर यांनी देश महासत्तेच्या दिशेने जात असल्याने हा विरोध असल्याचे सांगितले. तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी नारी वंदनीय आहे, नंदनीय करू नका असे सांगत हे आरक्षण आले तरी वरळीत आरक्षण झाले तर मलाच उमेदवारी मिळेल असाही विश्वास व्यक्त केला.


राखी जाधव यांनी महिलेला संधी मिळाली तर ती नेतृत्व करते असे सांगितले, तर बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी उबाठाला कांग्रेसच्या मांडीवर बसल्याचा आरोप केला. तर प्रिती सातम यांनी हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे पुढील महिला शिक्षा भोगणार असल्याचे सांगत मुस्लिम महिलांची तलाकमधून सुटका देशाच्या पंतप्रधानांनी केली असे सांगत ज्या पक्षाला घराणेशाहीच्या गाद्या उबवायच्या आहेत, म्हणून त्यांनी विरेाध केल्याचे सांगितले. शीतल गंभीर यांनी २७ वर्षांपूर्वी जर काँग्रेसने यावर निर्णय घेतला असता तर आज ही चर्चा करावी लागली नसती,असे सांगितले.



विशाखा राऊत यांनी उबाठाच्या महिला आघाडीचे स्वर्गीय सुषमा स्वराज यांनी कौतुक केल्याचे सांगितले. तर श्रध्दा जाधव यांनी महिला सक्षम असून हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे पंतप्रधानांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन महिलेला पंतप्रधान करावे अशी सूचना केली. तर तेजस्वी घोसाळकर यांनी विधेयक मंजूर न होणे हा काळा दिवस असल्याचे सांगितले. तर स्वप्ना म्हात्रे यांनी महिलेसारखी ताकद कुणाकडेच नसल्याचे सांगितले.


यावर महापौर रितू तावडे यांनी आपण महापौर किंवा पिठासीन अधिकारी म्हणून बोलत नसून एक महिला म्हणून बोलत असल्याचे सांगत हा राजकीय नैतिक दिवाळखोरीचा हा ठसठसीत पुरावा असल्याचे सांगितले. हीच का विरोधी पक्षाची महिला सक्षमीकरणाची व्याख्या का असा सवाल करत रितू तावडे यांनी विरोधकांना याची किंमत मोजावीच लागेल असा इशाराही दिला. हे विधेयक मंजूर झाले नसले तरी महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रवाह रोखला जावू शकत नाही,असे सांगत त्यांनी तीव्र शब्दांत याचा निषेध केला.


यावेळी चर्चत संध्या दोशी, विजय उबाळे,मेहेर हैदर,दिक्षा कारकर, विशाखा राऊत, तुलिफ मिरांडा, अंकित प्रभू, नवनाथ बन, मिनल तुर्डे, प्रकाश दरेकर,संगिता शर्मा, प्रमोद सावंत, राणी दि्वेदी, आशा मराठे, साईनाथ दुर्गे,हेतल गाला, सिध्दार्थ शर्मा, तेजिंदर तिवाना, विजेंद्र शिंदे, सचिन पडवळ आदींनी चर्चेत भाग घेतला होता.



Comments
Add Comment

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु