Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले नुकसान तातडीने भरून काढावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले. संबंधित प्रकरणात मत्स्यव्यवसाय विभागाने नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून हा प्रश्न मार्गी लावावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.


मंत्रालयात मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार महेश बालदी (Mahesh Baldi), मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. एन. रामास्वामी तसेच आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते. मोरा मच्छीमार सोसायटी आणि गावातील इतर मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यासाठी त्यांच्या नुकसानीचे योग्य वर्गीकरण करून सविस्तर अहवाल संबंधित विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.



गस्ती नौका आणि ड्रोन खरेदीचा आढावा :


याच बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या पाच गस्ती नौका आणि ड्रोनच्या खरेदी प्रक्रियेचा आढावाही घेण्यात आला. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Comments
Add Comment

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस