CM Devendra Fadnavis : 'अर्बन नक्षलवाद’ आणि अराजकता पसरवणाऱ्या शक्तींना युवाशक्तीच रोखणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

- भाजयुमोच्या ‘युवाशक्ती जागर यात्रे’चा प्रारंभ


मुंबई : राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि 'अर्बन नक्षलवादा'च्या माध्यमातून तरुणांच्या मनात संविधानाविरुद्ध विष पेरणाऱ्या शक्तींना रोखण्याचे काम 'युवाशक्ती जागर यात्रा' करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या राजव्यापी यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.


याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा अधिकृत प्रारंभ केला. मुख्यमंत्री म्हणाले की, "महाराष्ट्रात ३५ वर्षांखालील तरुणांची लोकसंख्या ६५ टक्के आहे. ही मोठी शक्ती जर संघटित होऊन एका दिशेने चालली, तर राज्यात मोठे परिवर्तन घडून येईल. मात्र, सध्या काही शक्ती युवकांमध्ये संविधानाविरुद्ध कलुषित मते पसरवत आहेत. या तरुणांना संविधानाने दिलेल्या व्यवस्थेप्रती जागृत करण्याची जबाबदारी युवा मोर्चा पार पाडेल."



महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर कठोर शब्दांत टीका केली. "संसदेत विरोधकांनी महिला आरक्षणाची जणू 'भ्रूणहत्या'च केली. जनगणना आणि पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) नावाखाली विरोधक खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. मुळात त्यांना आरक्षण द्यायचेच नाही, ही त्यांची बुरसटलेली मानसिकता आहे. या यात्रेच्या माध्यमातून नारीशक्तीला जागृत करून विरोधकांना या विधेयकाला पाठिंबा देण्यास भाग पाडले जाईल," असेही फडणवीस यांनी नमूद केले.



यात्रेचे स्वरूप आणि उद्दिष्टे :



  • भाजयुमोची ‘युवाशक्ती जागर यात्रा' संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असून शेतकरी, कामगार आणि आयटी क्षेत्रातील तरुणांपर्यंत पोहोचणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात गेल्यामुळे युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय व सामाजिक प्रगल्भता येईल.

  • कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाला राज्यातील पहिल्या क्रमांकाची संघटना बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारच्या योजना गावखेड्यातील शेवटच्या तरुणापर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

  • कृष्णराज महाडिक यांनी यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती देताना सांगितले की, केवळ राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील नेत्यांचे आणि विद्यार्थी चळवळीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या यात्रेसाठी घेण्यात आले असून, राज्यातील संपूर्ण युवावर्ग या मोहिमेत जोडला जाईल.

Comments
Add Comment

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात