लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच कुटुंबियांच्या मुलाकडून वाढलेल्या अपेक्षा या कारणामुळे आज अनेक मुलांना लग्न जमण्यास अडचण येत आहे. यापूर्वी तर मुलांनी लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून मोर्चे देखील काढलेले आहेत. आता याच सर्व गोष्टी विचारात घेता पुण्यातील एका उत्साही तरुणाने लग्नासाठी मुलगी मिळावी म्हणून अजबच पर्याय शोधला. अर्थात जेव्हा सत्य समोर आले तेव्हा त्याचा प्लॅन चांगलाच फसला.


नेमकं प्रकरण काय ?
लग्नासाठी उत्साही असलेला २६ वर्षीय तरुण ऋषिकेश राजू जाधव ( rushikesh jadhav ) याने लग्न जमवण्यासाठी आणि इम्प्रेशन” मारण्यासाठी भलताच प्रयोग केला. या तरुणाने स्वतःला पुणे शहर पोलीसमध्ये निवड झाल्याचे भासवण्यासाठी शहरभर फ्लेक्स लावले. लग्न जमत नसल्यामुळे आणि मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेशचे ( rushikesh jadhav ) लग्न जमत नव्हते. मुलींच्या घरी प्रभाव पाडण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्याने आपली पुणे शहर पोलीस दलात निवड झाल्याचे खोटे सांगितले. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने थेट पोलीस वर्दीतील फोटो काढून ते आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर (Whatsapp Status) ठेवले आणि "मी पोलीस झालो" असा प्रचार सुरू केला.


अखेर ऋषिकेशचे बिंग फुटले... 
विशेष म्हणजे त्याने स्वतःच्या अभिनंदनाचे मोठे फ्लेक्स नऱ्हे परिसरात लावले. या फ्लेक्सवर तो पोलीस वर्दीत (Fake Police) रुबाबदार दिसत होता. मात्र, परिसरातील खऱ्या पोलिसांच्या नजरेत हे फ्लेक्स पडले आणि त्यांना संशय आला. जेव्हा पोलिसांनी अधिकृतपणे या नावाच्या उमेदवाराची चौकशी केली, तेव्हा पुणे पोलीस दलात या नावाची कोणतीही व्यक्ती भरती झाली नसल्याचे (Fake Police) उघड झाले आणि ऋषिकेशचे बिंग फुटले.


एवढा खोटा गाजावाजा कशासाठी ?


हा सर्व प्रकार आणि खोटा गाजावाजा केवळ मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी आणि लग्नाची 'लाईन' लावण्यासाठी ऋषिकेशने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. नऱ्हे पोलीस ठाण्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ऋषिकेश जाधव विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 204 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेची चर्चा चांगलीच रंगली आहे. दरम्यान एकाबाजूला वाढणाऱ्या अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारीचा मुद्दा यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची

Dussehra 2026 : यंदा विजयादशमी २० की २१ ऑक्टोबरला ? जाणून घ्या रावण दहनाची योग्य वेळ आणि पूजेचे मुहूर्त!

भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत पवित्र, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे 'दसरा' किंवा

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते