Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय, त्यामुळे पाण्याची वाफ देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे धरणामंधील पाणीसाठा हा कमी होण्याची चिन्हे आहेत. पुण्यात पाणीकपातीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून प्रशासनाने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.



पुण्यात मुबलक पाणीसाठा


पाणीकपाती बाबत महत्वाचा निर्णय घेताना पुणे प्रशासनाने धरणांमधील सध्या पाणीसाठ्याची आधारे घेत आकडेवारीनुसार सध्याचा साठा ११.५ टीएमसी ( ३९ % ) असून गेल्या वर्षी हा साथ १०.४ टीएमसी ( ३६ %) होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ टीएमसी पाणीसाठा अधिक असल्याने पालिकेचा पाणी कपातीला विरोध आहे. तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांची स्थिती सध्या समाधानकारक आहे.



अल निनो च्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता असल्याने जलसंपदा विभागाने पुणे पालिकेला १५ % कपात करण्याचे आवाहन केले होते. समाधानकारक पाऊस पडेपर्यंत पाणीकपात चालू ठेवण्याचा प्रस्ताव त्या पत्रात मांडण्यात आला होता. मात्र पालिकेने प्रस्ताप तूर्तास बाजूला ठेवला आहे.



पालिकेच्या म्हणण्यानुसार शहरातील अनेक भागात कमीदाबाने पाणीपुरवठा होत आहे, यावरून नागरिक प्रचंड तक्रार करत आहेत. पाणीकपात हा उपाय नसून वितरण पद्धत सुधारली पाहिजे हे नागरिकांचे मत आहे. पुण्याच्या पाणीकपातीचा निर्णय सध्या बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही बैठक सध्या लांबणीवर आहे. कालवा समितीची बैठक पूर्ण झाल्यानंतरच पुण्यात पाणीकपात करायची की नाही हा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी