BMC सभागृहनेत्यांचा पुन्हा आवाजावरून त्रागा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही महापालिका प्रशासनाला यश आले असून याचे तीव्र पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. दोन महिने झाले तर महापालिका सभागृहातील माईकची व्यवस्था व्यवस्थित केली जात नसून सभागृहाच्या बाहेर डॉक्टर नियुक्त करणे, कार्डियाक रुग्णवाहिका तैनात ठेवणे तसेच सभागृहात उपस्थित केलेल्या प्रत्येक सदस्याला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधून ती समस्या जाणून घेण्याबाबत सूचनाही करूनही प्रशासनाचे अधिकार ऐकत नसल्याची खंत सभागृह नेत्यांनी बोलून दाखवत प्रशासनावर चांगले तोंडसूख घेतले.


मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील जुन्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील महापालिका आयुक्तांच्या बैठक सभागृहातील ध्वनी यंत्रणा बदलण्याकरता आलेल्या खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव आला असता यशोधर फणसे यांनी तीन महिने हेात आले तरी सभागृहातील ध्वनी यंत्रणा चांगल्याप्रकारे केली जात नाही. तसेच स्थायी समितीच्या बैठकीतील ही यंत्रणाही अधून मधून बंद होत असते. त्यामुळे पुढील बैठकीपर्यंत हा प्रस्ताव राखून ठेवण्याची सूचना केली. यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी आपण पहिल्या बैठकीपासून सभागृहाचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातून मी येथील लटकते माईक काढून त्या ध्वनी यंत्रणा बदलण्यासाठी प्रयत्नही केला आहे. पण चार दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेवू असे सांगितले जाते,पण अजुनही यात सुधारणा झालेली नाही. त्यानंतर मागील सभागृहात नगरसेवकांसाठी खानपान सुविधेसाठी कँटीनची जागा मोकळी करून दयावी तसेच सभागृहाबाहेर पिण्याची पाण्याची सुविधा, डॉक्टर आणि कार्डियाक रुग्णवाहिका तैनात करण्याची सूचना केली होती, पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगत सभागृहनेत्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने आम्हाला गृहीत धरु नये, आणि आम्ही काय इथे टेंडर मंजुर करायला येत नाही असेही खडे बोल सुनावले. यावर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सभागृहनेत्यांनी मांडलेल्या भावना या तीव्र असून प्रशासनाने याबाबत त्वरीत कार्यवाही करावी. परंतु महापालिकेचे मेंटेनन्स विभाग याबाबत गंभीर नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा; 11 सप्टेंबरपासून टोल पूर्णपणे माफ

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठा

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गणेशमूर्तीच्या वाहनाला टँकरची धडक; 4 जण जखमी

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी सकाळी गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनाला सिमेंटच्या टँकरने मागून

BMC : मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना मिळणार १ कोटींचा निधी?

नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची निधीचा ठराव सभागृहात मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

Mumbai Chicken Shops : मुंबईतील सर्व कोंबडी विक्रेत्यांच्या दुकानांची होणार तपासणी?

अनधिकृत असल्यास होणार कारवाई, महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील सर्व कोंबडी

Worli Century Mill : वरळीतील सेंच्युरी मिल, मुलुंड डम्पिंग ग्राऊंड तसेच सेव्हन हिल्स रुग्णालय भाडेतत्वावर देण्याचे प्रस्ताव मंजूर

महापालिका सभागृहात विरोधकांनी गोंधळ, महापौरांनी प्रस्तावांना दिली मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी): वरळीतील

Mumbai Water Crisis : मुंबईत पाणी प्रश्नावरून महापालिका सभागृह तापले

मालाडमध्ये अपुरा व गढूळ पाण्यावरून नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात रद्द