Maharashtra Cabinet Decisions : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतले चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय झाले. या निर्णयांची माहिती शासनाच्यावतीने प्रसारमाध्यमांना देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या चार निर्णयांमुळे ग्रामीण क्षेत्राला सर्वाधिक लाभ होणार आहे.


शासनाने राज्यासाठीचे कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण अर्थात सीबीजी जाहीर केले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर हे धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. बायोगॅस प्रकल्प पीपीपी, हायब्रीड अन्युईटी तत्वावर राबवले जाणार आहेत. बायोगॅस धोरण राबवण्यासाठी राज्य शासनाने यंदाच्या वर्षी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन करणे आणि हरित गृह वायू उत्सर्जन कमी करणे यासाठी बायोगॅस धोरण लाभदायी ठरणार आहे.


राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. लाभार्थी शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळणार आहेत.


सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय. टी. पार्कला जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ४२. ५५ हेक्टर जमीन देण्यात येणार आहे. आय. टी. पार्कमुळे सातारा जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार आहे. स्थानिक युवकांना रोजगार - व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.


राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार भोगवटादार वर्ग – २ मधून भोगवटादार वर्ग – १ मध्ये रुपांतरणाच्या अधिमुल्याची पुनर्रचना करण्यासाठी अधिसूचना काढण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने