Gold Silver Rate : आनंदाची बातमी ! सोन्याचे दर पुन्हा घसरले; प्रति तोळ्यामागे 'इतक्या' रुपयांची घसरण , चांदीही झाली स्वस्त

गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढउतार ( Gold Silver Rate Update ) पहायला मिळत आहे. सोने चांदीचे दर हे गगनाला भिडलेले आहे, त्यामुळे सोने-चांदीची खरेदी करावी की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सोन्याचा दर दीड लाखांच्या पार गेल्याने याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. अशातच आता सोन्याच्या दरात घसरण झाल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याचे दर सलग २-३ दिवसांपासून घसरताना दिसत आहेत.


मागच्या आठवड्यात सोन्याच्या ( Gold Silver Rate Update ) दरात वाढ झाली होती. त्यानंतर आता सोन्याचे दर २-३ दिवसांपासून सातत्याने घसरत असल्याने खरेदीदारांना थोडासा दिलासा मिळाला आहे. ऐन लग्नसराईत सोने खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. सोन्याचे दर अजून कमी होण्याची आशा सर्वसामान्यांना आहे.


सोन्याचे दर किती घसरले? ( Gold Rate )
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी ५१५ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५७,०७५ रुपयांपर्यंत खाली आले होते. गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी ११३३ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५५,९४२ रुपयांपर्यंत घसरले.


चांदीचे दर किती घसरले? ( Silver Rate )
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी २०६० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,५९,५६० रुपयांपर्यंत खाली आले होते. गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी ४१२० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,५५,४४० रुपयांपर्यंत घसरले.


सोन्याचे दर जरी घसरत असले तरीही ते दीड लाखांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे हे सामान्य कुटुंबातील व्यक्तींना परवडणारे नाहीच. सोने आणि चांदीच्या दरात झालेली अलीकडची मोठी घसरण ( Gold Silver Rate Update ) ही केवळ एक साधी बाजारातील हालचाल नसून, तिच्यामागे अनेक जागतिक आणि स्थानिक आर्थिक घटक कार्यरत आहेत. ही घसरण भारतापुरती मर्यादित नसून जागतिक स्तरावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. विशेषतः कॉमेक्स या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ०.६८ टक्क्यांनी घसरून ४,७२० डॉलर प्रति औंसवर पोहोचला, तर चांदीचा भाव २.४३ टक्क्यांनी कमी होऊन ७६ डॉलर प्रति औंसवर आला. यावरून स्पष्ट होते की, ही घसरण व्यापक आर्थिक परिस्थितीशी निगडित आहे आणि केवळ स्थानिक मागणी-पुरवठ्याचा परिणाम नाही.

Comments
Add Comment

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस