Jalgaon Accident : भीषण अपघात, दुचाकीचं नियंत्रण सुटलं अन् विपरीत घडलं, पती-पत्नी जागीच ठार

जळगाव : जळगाव-जामनेर महामार्गावर भीषण अपघाताची (Jalgaon Accident News) घटना समोर आली आहे. जळगाव-जामनेर महामार्गावरील (Jalgaon Jamner Highway) तोरणाळा येथील स्मशानभूमी जवळ एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. दुचाकी आणि ट्रॅक्टर यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात (Jalgaon Accident News) एवढा भीषण होता की या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत असलेली केवळ एक वर्षाची चिमुकली मुलगी चमत्कारिकरित्या बचावली आहे.


नेमकी घटना काय?
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय 50) आणि सोनाली गोपाल खडके (वय 45, रा. सातबारा) हे आपल्या दुचाकीने घरी परतत होते. जामनेर महामार्गावरील तोरणाळा गावाजवळील स्मशानभूमीजवळ आले असताना, त्यांचे वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. आणि समोरून चाललेल्या एका ट्रॅक्टरला दुचाकीने मागून जोरदार धडक दिली.


भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार
हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर गोपाल वासुदेव खडके आणि सोनाली गोपाल खडके हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्यामुळे या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताच्या (Jalgaon Accident News) वेळेस त्यांच्या सोबत असलेली त्यांची एक वर्षाची लहान मुलगी देखील होती. मात्र, निसर्गाचा चमत्कार म्हणावा की दैव बलवत्तर, इतक्या भीषण अपघातात या चिमुकलीचे प्राण सुदैवाने वाचले आहेत.


खडके कुटुंबावर दुःखाचा कोसळला डोंगर
हा अपघात (Jalgaon Accident News) इतका भीषण होता की अपघात घडत्याक्षणी मोठा आवाज झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी लागलीच मदतीसाठी अपघातस्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जामनेर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू


दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे मंगळवारी रात्री बिबट्याने शेतमजुराच्या दोन वर्षांच्या चिमुरडीला शेतात ओढून नेले. यात ज्ञानेश्वरी मोरे या चिमुरडीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वलखेड येथे बळवंत शिंदे यांच्या शेतात विलास गिरिधर मोरे हे शेतमजुरी करतात. मंगळवारी रात्री घरासमोरील शेडमध्ये आई-वडील आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी ज्ञानेश्वरी बसलेले होते. यावेळी शेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक ज्ञानेश्वरीवर झडप घातली. तिला जबड्यात पकडून शेतात ओढून नेले. हे पाहताच शेजारी व परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली. मात्र, बिबट्या बालिकेला घेऊन अंधारात पसार झाला होता. बालिकेचे शव उत्तरीय तपासणीसाठी दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर रात्री शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा