Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन विभागामार्फत आंतरराष्ट्रीय ‘डार्क स्काय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर ‘खगोल दर्शन महोत्सव २०२६’चे आयोजन २४, २५ व २६ एप्रिल २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे करण्यात आले आहे. या पर्यटन महोत्सवात खगोलप्रेमी व पर्यटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.


महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), ॲस्ट्रॉनइरा आणि डार्क स्काय इंटरनॅशनल यांच्या विद्यमाने डार्क स्काय सप्ताह हा उपक्रम राबविण्यात येत आहे, तसेच ॲस्ट्रॉनइराच्या संस्थापिका व संचालिका श्वेता कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून स्टारगेझिंग सत्रांचे आयोजन करण्यात येत असून खगोल अभ्यासक, विद्यार्थी व पर्यटनप्रेमींसाठी हा एक अनोखा, ज्ञानवर्धक व अनुभवसमृद्ध उपक्रम ठरणार आहे.


हरिहरेश्वर हे मुंबईपासून सुमारे चार तासांच्या अंतरावर वसलेले शांत, निसर्गरम्य आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले कोकणातील पर्यटनस्थळ असून समुद्रकिनारे, हिरवीगार डोंगररांग आणि प्रसिद्ध हरिहरेश्वर मंदिरामुळे ‘देवघर’ म्हणून ओळखले जाते. येथे असलेले एमटीडीसी हरिहरेश्वर रिसॉर्ट समुद्रकिनाऱ्याजवळ व शांत परिसरात वसलेले असून येथे पर्यटकांसाठी प्रीमियर सूट, कॉटेज, सी-फेसिंग कॉटेज व एक्झिक्युटिव्ह रूम्ससह आरामदायी निवास व्यवस्था उपलब्ध आहे. हरिहरेश्वरची व्यापक प्रचार व प्रसिद्धी होऊन देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी या ठिकाणाला अधिक पसंती द्यावी, या उद्देशाने हरिहरेश्वर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम विशेषरित्या आयोजित करण्यात येत असून पर्यावरणपूरक व अनुभवाधारित पर्यटनाला चालना देणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.


महाराष्ट्रात प्रथमच होणाऱ्या या महोत्सवात स्टारगेझिंग (आकाश निरीक्षण) सत्रे, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खगोल विषयक संवादात्मक प्रदर्शने, प्रकाश प्रदूषण व ‘डार्क स्काय’ संवर्धनावरील माहितीपर उपक्रम तसेच पर्यावरण जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये प्रकाश प्रदूषणाचे दुष्परिणाम, नैसर्गिक अंधाराचे महत्त्व तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. खगोलशास्त्र, पर्यावरण व पर्यटन यांची सांगड घालत हा महोत्सव पर्यटकांना एक वेगळा अनुभव देणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर