By-election : बारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. राहुरीच्या जागेवर शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे निवडणूक रिंगणात आहेत.


बारामतीच्या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पण काँग्रेसने ही जागा लढवणार असल्याचा चंग बांधला होता. पण नंतर या येथे उभे असलेल्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला आहे. राहुरीच्या जागेसाठी २२ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.


बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आता अनपेक्षितपणे रंगतदार व चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात तब्बल ५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक आता तितकी सोपी राहिलेली नाही. सहानुभूतीची लाट मिळेल आणि विरोधक मागे हटतील, अशी अपेक्षा होती. पण मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरल्यामुळे लढत अधिकच कठीण बनली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील राजकीय वारसा टिकवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी सक्रिय पावले उचलली. त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत राज्याच्या राजकारणात थेट प्रवेश केला. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी बारामतीतील रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.


या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी, २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि ‘बिग बॉस’मधील माजी स्पर्धक अभिजित बिचुकले यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. बारामती पोटनिवडणूक आता केवळ औपचारिकता न राहता एक मोठी राजकीय लढत ठरणार आहे. विविध पक्ष, अपक्ष उमेदवार आणि स्थानिक मुद्दे यामुळे ही निवडणूक राज्याच्या राजकारणात विशेष लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.


भाजपने दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्यावर विश्वास दाखवत राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात तब्बल २२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीप्रमाणेच वंचित बहुजन आघाडीनेही शेवटच्या क्षणी उमेदवार बदलत देवळाली प्रवराचे नगरसेवक संतोष चोळके यांना रिंगणात उतरवले आहे. याशिवाय शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शिंदे गटाचे रवींद्र मोरे तसेच सविता राजेंद्र शेटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून लढतीत रंग भरला आहे.


बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान यंत्रे (ईव्हीएम), व्हीव्हीपॅट, प्रशिक्षित निवडणूक कर्मचारी तसेच पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सोय, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा तसेच विविध तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

Comments
Add Comment

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण