Shutdown in Islamabad : पाकिस्तानमध्ये चाललंय काय ? इस्लामाबादमध्ये १० दिवसांपासून लॉकडाऊन

इस्लामाबाद : अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ पासून इराण विरोधात हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्ध भडकले. या युद्धात पाकिस्तान अद्याप थेट सहभागी झालेला नाही. पण युद्धामुळे पाकिस्तानवरच मोठे संकट आले आहे. महागाई गगनाला भिडली आहे. कामधंदे ठप्प असल्यामुळे बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे. पण लोकप्रतिनिधींकडे पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळच नाही.


अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी शस्त्रसंधीच्या मुद्यावर चर्चेसाठी येणार असल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पाकिस्तानने राजधानी इस्लामाबादमध्ये सामान्यांसाठी अनेक मनाई हुकूम जारी केले आहेत. यामुळे इस्लामाबादमध्ये मागील दहा दिवसांपासून लॉकडाऊन सारखीच स्थिती आहे. सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. बाजारपेठा बंद आहेत. कामधंदे ठप्प असल्यामुळे हातावर पोट असलेल्या बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे. महागाई गगनाला भिडली आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळवणे सामान्य नागरिकांसाठी कठीण झाले आहे.


इस्लामाबादमध्ये ठिकठिकाणी जवानांचा पहारा आहे. प्रमुख चौकांमध्ये, अनेक रस्त्यांवर कायम जवानांचा पहारा आणि नाकाबंदी केल्याचेच दिसत आहे. या सुरक्षा व्यवस्थेमुळे सामान्यांसाठी जगणे कठीण झाले आहे.


पाकिस्तान शस्त्रसंधी होणार असल्याचे सांगत असला तरी प्रत्यक्षात अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी अधूनमधून एकमेकांना धमक्या देणे, इशारे देणे असे प्रकार करत आहेत. वारंवार अमेरिका आणि इराणकडून परस्परविरोधी दावे सुरू आहेत. यामुळे तणाव वाढत आहे. तणाव कमी होत नाही आणि अघोषीत लॉकडाऊन संपत नाही म्हणून पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे