काळं सोनं संकटात ! होर्मुझमुळे इराण पहिल्यांदाच बॅकफूटला, नेमकं काय घडलं ?

अमेरिका, इस्रायलनं २८ फेब्रुवारीपासून इराणवर हल्ले सुरु केले. आणि जगाची डोकेदुखी वाढली. या हल्ल्यामध्ये जगाला डोकेदुखी ठरणारा निर्णय इराणने घेतला. तो म्हणजे इराणने थेट होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक रोखली. यामुळे जगाला इंधन टंचाई आणि इंधन महागाईचा मोठा फटका बसण्यास सुरुवात झाली. इराणसाठी ट्रम्प कार्ड ठरलेली होर्मुझची सामुद्रधुनी आता त्यांच्याचसाठी अडचणीची ठरु लागली आहे


अमेरिकेनं नौदलाच्या होर्मुझमधील नाकाबंदीचा सर्वाधिक फटका इराणलाच सध्या बसू लागला आहे. युद्ध सुरु झाल्यावर इराणला होर्मुझमुळे फरक पडला नव्हता. कारण इराणची आयात-निर्यात व्यवस्थित सुरु होती. उलट इराणची कमाई वाढली होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. अमेरिकेच्या नाकाबंदीनं इराणची तेल संपन्नतादेखील धोक्यात आली आहे. अमेरिकेच्या नाकाबंदीनं तेल निर्यात कमी झाली आहे.


आखाती देश मिळून जितकी आयात करतात, त्यातील ५० टक्के धान्य इराणला जातं. ही सगळी आयात होर्मुझमधूनच चालते. अमेरिकेनं नाकाबंदी लावत होर्मझमधून होणारी वाहतूक रोखल्यावर इराणनं बंदर अल खामेनीच्या जागी छाबहार बंदराचा वापर सुरु केला. पण छाबहारची क्षमता केवळ २० टक्के आहे. हीच अवस्था औषधांच्या पुरवठ्याचादेखील आहे.


सध्या इराणकडे तेल साठवायला जागा नसल्यानं इराणला नाईलाजानं तेल उत्पादन बंद करावं लागत आहे. अशाने तेल विहिरी बंद करण्याची नामुष्की इराणवर येईल. तेल विहिरी एकदा बंद केल्यावर त्या लगेच सुरु करता येत नाही. त्यातील दाब बिघडण्याचा धोका असतो. तेल खाली जाऊन पाणी वर येऊ शकतं. त्याला वॉटर कॉनिंग असं म्हणतात.तेलाची विहीर एकदा बंद केल्यावर ती सुरु करण्यासाठी बरीच मेहनत लागते. त्यासाठी मोठा खर्च येतो. विहिरीतून पुन्हा आधी इतकंच उत्पादन काढता येईल याचीही खात्री देता येत नाही. त्यामुळे इराणचं तेल उत्पादन घटण्याचा मोठा धोका आहे.


होर्मुझची सामुद्रधुनी इराणसाठी महत्त्वाची का ?


इराण सरकारला मिळणारा बहुतांश महसूल खनिज तेलातून येतो. इराणच्या मध्यवर्ती बँकेच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये इराणच्या एकूण निर्यातीत खनिज तेलाचा वाटा ६५ ते ७५ टक्के इतका होता. यातील ९२ ते ९६ टक्के तेल वाहतूक होर्मुझमधून चालते. इराणची ९० टक्के तेल वाहतूक खार्ग बेटावरुन होते. याचा अर्थ होर्मुझशिवाय इराणला गत्यंतर नाही. इराणची आयातदेखील संकटात सापडली आहे. मध्य पूर्वेतील सगळ्यात मोठा धान्य आयात करणारा देश इराणच आहे. आखाती देश मिळून जितकी आयात करतात, त्यातील ५० टक्के धान्य इराणला जातं. ही सगळी आयात होर्मुझमधूनच चालते.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा